Nanded News : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून सात लाख ७९ हजार २३५ हेक्टर पेरणी क्षेत्रापेकी तब्बल सहा लाख ४८ हजार ५३३ हेक्टर वरील जिरायती, बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..या आपत्तीचा फटका एक हजार ५३७ गावांतील ७ लाख १२ हजार ६१० शेतकऱ्यांना बसला. या बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ५७४.२९ कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने अंतिम अहवालानुसार विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे..नांदेड जिल्ह्यात १४ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट व ता. २८ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे पुरस्थिती उद्भवून एक हजार ५३७ गावांतील सात लाख १२ हजार ६१० शेतकरी बाधित झाले होते. या काळात जिल्ह्यात पेरणी झालेल्या एकूण सात लाख ७९ हजार २३५ हेक्टरपैकी सहा लाख ४८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती व फळपिके नष्ट झाली आहेत. .Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका.यात १८ नागरिकांचा बळी गेला, तर २२२ पशुधनही दगावले होते. या नुकसानीबाबत शासकीय यंत्रणांनी तयार केलेला अंतिम अहवाल बुधवारी (ता. १०) छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे सादर केला. .यात जिरायती, बागायती व फळपीक बाधितांच्या सहा लाख ४८ हजार ५३३ हेक्टरच्या भरपाईसाठी ५५३.४९ कोटी, तर शेतजमीन खरडून गेलेल्या चार हजार १३६ हेक्टर व मातीचा थर वाहून गेलेल्या ७६० हेक्टरसाठी २०.८१ कोटी असा एकूण ५७४.२९ कोटींच्या निधीची मागणी केली आहे..Crop Damage: पावणेतीन लाख हेक्टरवर लातूर जिल्ह्यात फटका.वाढीव दरानुसार भरपाई नाही, शेतकऱ्यांत तीव्र नाराजीनुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत शासनाने जुन्या दरानुसारच निधीची मागणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. यानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचेश, बागायती पिकांसाठी सतरा हजार, तर फळपीकांसाठी २२ हजार ५०० रुपये अनुदान दोन हेक्टर मर्यादेत वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. .यामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाने कोल्हापूर किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वाढीव भरपाई दराचाही विचार केला नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.Crop Damage.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.