Raigad News : शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी मेढेखार, कुसुंबळे परिसरातील हजारो एकर जमीन काही कंपन्यांनी खरेदी केली आहे; परंतु या ठिकाणी आजतागायत एकही प्रकल्प सुरू झाला नसल्याने खरेदी केलेल्या जमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवार (ता. ९) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले..अलिबाग तालुक्यातील मेढेखार, कुसुंबळे, कातळपाडा, काचली, पिटकीरी, खातविरे गावातील ३८० शेतकऱ्यांच्या जमिनी मे. पटनी एनर्जी प्रा.लि., गायत्री लॅण्ड रिॲलिटी प्रा.लि., हिंगलज लॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., गणेश लॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., देवर्षी लॅण्ड प्रा.लि. यांसारख्या नऊ कंपन्यांनी शेतीविषयक व्यवसाय सुरू करण्याच्या खरेदी केल्या..Land Acquisition Scam : भूसंपादन अधिकाऱ्यानेच वाढविले १४० कोटी.रोजगार मिळेल या आशेने शेतकऱ्यांनीही जमिनी विकण्यास तयारी दर्शवली; परंतु जमिनी खरेदी करून १५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन कंपन्यांनी उद्योग सुरू केलेला नाही. या कंपन्यांनी जमिनीवर प्रकल्प उभारले नाहीत..Land Acquisition: विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कपात .शासनाचे दुर्लक्षशासनाच्या पाटबंधारे, खारलॅण्ड कार्यालयाने लक्ष दिले नाही. जमिनीच्या जागेत समुद्र वनस्पती, खारफुटींचे जंगल वाढलेले आहे. शेतजमिनी पूर्णपणे ओसाड, नापीक झाल्या आहेत. .या भांडवलदार कंपन्यांमुळे जमिनींची दुर्दशा झाली आहे. तरीही शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी मेेढेखार, कुसुंबळे परिसरातील शेतकऱ्यांची आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.