Edible Oil Import Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil Import : कृषिप्रधान देशात खाद्यतेल आयात चिंतेची बाब : शिंदे

Edible Oil Market : ग्राहकांना शुद्ध व भेसळविरहित तेलाची गरज आहे. मात्र अजूनही याबाबत अनेक अडचणी आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik News : ‘‘ग्राहकांना शुद्ध व भेसळविरहित तेलाची गरज आहे. मात्र अजूनही याबाबत अनेक अडचणी आहेत. भारताला एकूण गरजेच्या तुलनेत अजूनही खाद्यतेलाच्या संदर्भात दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात तेल आयात चिंतेची बाब आहे. त्यामुळे लाकडी घाणा तेल संघाने ती गरज पूर्ण करावी,’’ असे प्रतिपादन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले.

राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य लाकडी घाणा तेल उत्पादक संघाच्या प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन मोहाडी (ता. दिंडोरी) येथे ‘सह्याद्री फार्म्स’ येथे करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिंदे बोलत होते. ‘एफएसएसएआय’चे सदस्य तथा खाद्य तंत्रज्ञानशास्त्रज्ञ डॉ. डी. एन. कुलकर्णी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘लाकडी घाणा तेल व्यवसाय ही गरज पूर्ण करू शकतो. कारण, उत्तम गुणवत्ता हीच लाकडी घाणा तेलाची ताकद आहे. छोट्या व्यावसायिकांनी संघटित होऊन एकत्र काम करावे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी 'सह्याद्री फार्म्स' उभे केले, त्याप्रमाणे लाकडी घाणा तेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन ब्रॅण्ड तयार करावा. यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास तयार आहोत.’’

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘तेल शरीरासाठी आवश्यक असून महत्त्वाची जीवनसत्वे त्यातून मिळतात. तसेच आपले शरीर हेच कोलेस्टेरॉल तयार करत असून तेलाव्दारे कोलेस्टेरॉल वाढते हा केवळ अपप्रचार आहे.’’

डॉ. हळदे म्हणाले, ‘‘तेल हे शारीरिक ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. तेल शरीराला ९ कॅलरी इतकी ऊर्जा देते. प्रत्येक तेलात वेगळे गुणधर्म असल्याने सतत एकच तेल न खाता अदलून-बदलून सर्व प्रकारच्या तेलाचे सेवन करावे.’’

वर्षभरातील संघटनेच्या कामाचा आढावा अध्यक्ष ओमकार एकशिंगे यांनी मांडला. खजिनदार बाबासाहेब साठे यांनी लेखापरीक्षण अहवाल मांडला. सचिव प्रतीक निरभवने यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे पदाधिकारी स्नेहल राऊत, एकनाथ हत्ते, संतोष माकुडे, धनंजय वार्डेकर यांसह राज्यातील २०० हून अधिक व्यावसायिक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT