Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : ओलाव्यामुळे कापसाचे कापसाचे भाव कवडीमोल; सीसीआयने खरेदी करण्याची मागणी

Cotton Market Update : बाजारात कापसाची आवक सध्या वाढत आहे. पण पहिल्या वेचणीच्या कापसात ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी ५ हजारांपासून कापूस विकावा लागत आहे.

Anil Jadhao 

Pune News : बाजारात कापसाची आवक सध्या वाढत आहे. पण पहिल्या वेचणीच्या कापसात ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी ५ हजारांपासून कापूस विकावा लागत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरी अचडणीत आले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सीसीआयने कापूस खरेदीचे निकष सिथिल करण्याची मागणी केली जात आहे.

दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांना खरिपातील पीक विकून पैशांची तजवीज करावी लागते. सध्या खऱिपातील महत्वाच्या सोयाबीन आणि कापूस पिकाची काढणी सुरु आहे. बहुतांशी भागात कापसाची पहिली वेचणी सुरु आहे. मात्र सध्या सोयाबीनचा भाव खूपच कमी आहे. तर कापसाला सोयाबीनपेक्षा जास्त भाव मिळत आहे. पण हा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. सोयाबीनही अगदी ४ हजारांपासून विकले जात आहे. त्यामुळे शेतकरी गरजेएवढा कापूस विकून दिवाळी साजरी करत आहेत.

पहिल्या वेचणीच्या कापसात ओलावा जास्त आहे. त्यात नुकत्या झालेल्या पावसाने वचणीला आलेल्या कापसाला फटका बसला. परिणामी गुणवत्ता कमी झाली. हा कापूस बाजारात नेल्यानंतर कापसाला अगदी ५ हजारांपासून भाव मिळत आहे. हा भाव हमीभवापेक्षा खूपच कमी आहे. यंदा सरकारने कापसाला ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला. म्हणजेच ओल्या कापसाला हमीभावापेक्षा किमान २ हजार ५०० रुपये कमी भाव मिळत आहे. 

सीसीआयने कापसाची खरेदी सुरु केली. पण सीसीआय १२ टक्क्यापेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही. त्यामुळे ओला कापूस खुल्या बाजारातच विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तसेच सीसीआयला कापूस दिल्यानंतर पैसे येण्याला वेळ लागतो. परिणामी शेतकरी दिवाळीसाठी खुल्या बाजारातच कापूस विकत आहेत. 

ओलाव्याची अट १८ टक्के करा

शेतकऱ्यांची ही अचडण लक्षात घेऊन काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने सीसीआयला कापूस खरेदीसाठीचा ओलाव्याचा निकष शिथिल करण्याची मागणी केली. सीसीआयने ओलाव्याची अट १२ टक्क्यांवरून १८ टक्के करावी, अशी मागणी सीएआयने केली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT