Turmeric Cotton  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Commodity Market : कापूस, मका, हळदीच्या भावात घट

Soybean Market : जागतिक पातळीवर या वर्षी सोयाबीनचा पुरवठा मागणीपेक्षा मोठ्या प्रमाणावर जास्त आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोयाबीनच्या किमती अजूनही घसरत आहेत.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ६ ते १२ एप्रिल, २०२४

या सप्ताहात सोयाबीन व हरभरा वगळता सर्वच पिकांचे भाव कमी झाले. सोयाबीनचे भाव गेल्या तीन सप्ताहांत कमी दराने का होईना वाढत आहेत. अर्थात, ही वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा ती खूपच कमी आहे.

२०२३-२४ मध्ये सायोबीनचे जागतिक उत्पादन ५ टक्क्यांनी वाढले; त्या अगोदरच्या वर्षीसुद्धा ते याच दराने वाढले होते. वर्ष-अखेर साठासुद्धा या वर्षी १३ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. थोडक्यात, जागतिक पातळीवर या वर्षी सोयाबीनचा पुरवठा मागणीपेक्षा मोठ्या प्रमाणावर जास्त आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोयाबीनच्या किमती अजूनही घसरत आहेत.

भारतात मात्र याच वर्षी (२०२३-२४ मध्ये) सोयाबीनच्या उत्पादनात ११ ते १६ टक्क्यांनी घट होईल, असे सर्व अंदाज सांगत आहेत. वर्षअखेर साठासुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी असेल असा FAO व USDA यांचा अंदाज आहे.

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय किमतीच्या प्रभावाने भारतातील किमती घसरत होत्या. यापुढे भारतातील उत्पादनाचा परिणाम किमतीवर पडणार आहे का हे पुढील काही दिवसांत कळेल. अर्थात मॉन्सूनचा अंदाज व पुढील वर्षासाठी सोयाबीनखालील क्षेत्र हे घटक नजीकच्या भविष्यातील सोयाबीनच्या किमतीच्या दृष्टीने निर्णायक ठरतील.

१२ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६०,५८० वर आले होते. या सप्ताहात ते १.६ टक्क्यांनी घसरून रु. ५९,६२० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव २.८ टक्क्यांनी घसरून रु. ५९,८६० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव रु. ६०,५०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १.५ टक्क्याने अधिक आहेत. कापसाची आवक कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.५ टक्क्याने घसरून रु. १,४८८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ४.३ टक्क्यांनी घसरून रु. २,२०० वर आले आहेत. फ्यूचर्स (मे) किमती ६.२ टक्क्यांनी घसरून रु. २,१७९ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,२०५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या केवळ ०.२ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची आवक कमी होत आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १६,५७७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.९ टक्क्यांनी घसरून रु. १५,९३३ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती ७.४ टक्क्यांनी घसरून रु. १६,११२ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १६,५७८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ४ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात रु. ५,७०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ६,००० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक वाढत आहे.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) १.६ टक्क्याने घसरून रु. ९,२५० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) २.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,७९८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,००५ वर आली होती. या सप्ताहात ती २ टक्क्यांनी घसरून रु. ९,८०० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,३७९ होती. या सप्ताहात ती रु. १,३५० वर आली आहे. गेल्या तीन महिन्यांत कांद्याची आवक स्थिर आहे; किमती मात्र ८ मार्च पासून घसरत आहेत. रब्बीची आवक पुढील महिन्यात सुरू होईल.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ७५० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल. कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो). कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Production : भात, भुईमुगाच्या उत्पादनात आजरा तालुक्यात घट

Sugarcane workers : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊसतोड कामगारांवर काळाची झडप; सीना नदीत ४ ऊसतोड कामगार बुडाले

Solapur Assembly Constituency : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांसाठी ३८५ अर्ज दाखल

Sugar and Ethanol : साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलची खरेदी किंमत वाढवू; केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशीचे विस्माला आश्वासन

Crop Damage Compensation : सांगलीत अवकाळी, अतिवृष्टिबाधित पिकांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT