Turmeric Cotton  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : कापूस, मका, हळदीच्या किमतींत घट

Tur Rate : तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,५७६ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्क्याने वाढून रु. १०,६४३ वर आली आहे.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह - १३ ते १९ जुलै २०२४

सेबीच्या मासिक अहवालानुसार मार्च २०२४ अखेर संपलेल्या वर्षात MCX मध्ये कापसाचे रु. ३,१५९ कोटीचे व्यवहार झाले. कपाशीचे फक्त रु. १.३ कोटीचे व्यवहार झाले. याच वर्षात NCDEX मध्ये कापसाचे रु. ४.३ कोटी, कपाशीचे रु. २,७३२ कोटी, मक्याचे रु. ०.३ कोटी व हळदीचे रु. १८,९६७ कोटी असे व्यवहार-मूल्य होते.

NCDEX मध्ये हळदी बरोबर गवार बी, गवार गम, सरकी पेंड, धने व एरंडी बी हे महत्त्वाचे शेतीमाल आहेत. त्यांच्या तुलनेने कापूस कमी महत्त्वाचा आहे. मक्याचे व्यवहार तर नगण्य आहेत. यामुळे NCDEX मधील मक्याच्या फ्यूचर्स किमती या बहुतेक वेळी गणिती (calculated) आहेत हे लक्षात ठेवावे व त्यात व्यवहार करण्याअगोदर ब्रोकरचा सल्ला घ्यावा.

कापसाच्या बाबतीत MCX मधील व्यवहार NCDEX च्या तुलनेने खूपच अधिक आहेत. कपाशीमध्ये उलट परिस्थिती आहे; येथे NCDEX मधील व्यवहार अधिक आहेत. यामुळे या सप्ताहापासून कपाशीच्या किमती NCDEX मधील देण्यात येतील.

कापसाच्या किमती पूर्वीप्रमाणे MCX मधील असतील. कापूस, कपाशी, मका व हळद यापैकी कोणत्याही पिकासाठी ऑप्शन ट्रेडिंग दोन्ही एक्स्चेंजमध्ये उपलब्ध नाही. चांगल्या पावसामुळे या सप्ताहात तूर व सोयाबीन वगळता सर्व खरीप पिकांच्या किमती उतरल्या.

१२ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.१ टक्क्याने घसरून रु. ५८,००० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.१ टक्क्याने घसरून रु. ५७,९४० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव २.२ टक्क्यांनी घसरून रु. ५८,१७० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५५,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी कमी आहेत.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.५ टक्क्याने घसरून रु. १,५०६ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५४६ वर आले आहेत, तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,६१० आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. (अनुक्रमे रु. १,४२४ व रु. १,५०४ प्रति २० किलो).

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात २ टक्क्यांनी वाढून रु. २,५५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्याने घसरून रु. २,५१० वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती २.१ टक्क्यांनी घसरून रु. २,५१६ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स रु. २,५४५ वर आहेत.

स्पॉटपेक्षा हा भाव १.४ टक्क्याने अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत. मक्याच्या किमतीमध्ये वाढता कल आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १६,५५२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने घसरून रु. १६,३७० वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १५,८७६ वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १६,५०८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.८ टक्क्याने अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ६,६०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्याने वाढून रु. ६,६१३ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,१०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.३ टक्क्याने वाढून रु. ४,५८३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,५७६ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्क्याने वाढून रु. १०,६४३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,८५० होती; या सप्ताहात ती रु. २,८०० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४,००० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT