Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला २५०० रुपयांपर्यंत दर

Maize Rate : विदर्भातील मक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ-खानदेशच्या सीमेवरील मलकापूर (जि. बुलडाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीत मका सध्या कमाल २५०० रुपयांपर्यंत विकला जात आहे.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

Akola News : विदर्भातील मक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ-खानदेशच्या सीमेवरील मलकापूर (जि. बुलडाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीत मका सध्या कमाल २५०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. शनिवारी (ता. २०) या बाजार समितीत मक्याला कमाल २५१५ रुपये व सरासरी २३०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांकडून देण्यात आली.

विदर्भ-खानदेशच्या सीमेवर ही बाजार समिती असून येथून दरवर्षी हजारो क्विंटल मक्याची उलाढाल होत असते. दरवर्षी वेगवेगळया राज्यांत येथून मका पाठवला जातो. सध्या नवीन आवक सुरू व्हायला अजून बराच काळ लागणार आहे. लागवड केलेल्या क्षेत्रातील मक्याचे पीक आता कुठे वाढीच्या स्थितीत आहे.

Maize
Maize Production Campaign : मका उत्पादन वाढीसाठी ७८ जिल्ह्यांत अभियान

शेतकरी लष्करी अळीपासून मक्याला वाचवण्यासाठी पोंग्यात कीटकनाशके सोडण्याचे काम करीत आहेत. सध्या बाजारात मक्याची आवक जेमतेम होत आहे. शनिवारी अवघी १४ क्विंटल आवक झाली होती.

यातील १० क्विंटल मका २५१५ रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. येथे सरासरी २३०० रुपये दराने विक्री झाला. या आठवड्यात मक्याच्या दराने अडीच हजारांचा पल्ला गाठला आहे. मागणी अधिक व आवक कमी होत असल्याने सर्वत्र मक्याच्या दरात सुधारणा झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Maize
Maize Market : मक्‍याचा देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा

तुरीला कमाल दर ११४०० रुपये

बाजार समितीत इतर शेतीमालाच्या तुलनेत तुरीची आवक चांगली होत आहे. शेतकरी साठवून ठेवलेली तूर विक्रीला काढत आहेत. शनिवारी (ता. २०) सुमारे ३९० क्विंटल आवक झाली होती. यातील जवळपास ९० क्विंटल तूर ही कमाल ११४०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली. ५० क्विंटल तूर १००८० रुपये दराने विक्री झाली. बाजारात आलेल्या तुरीला सरासरी ११०५५ रुपये दर निघाला, असे बाजार समिती सूत्रांचे म्हणणे होते.

गेले अनेक दिवस तुरीचा दर ११ हजारांपर्यंत मिळतो आहे. बाजार समितीत इतर शेतीमालात ज्वारीची आवक वाढलेली आहे. शनिवारी ज्वारी सरासरी २३३५ रुपयांनी विक्री झाली. सुमारे ३२० क्विंटल माल विक्रीला आला होता. सोयाबीनची आवक २८० क्विंटल होती. सोयाबीन कमाल ४४०० रुपये तर किमान ३८२५ रुपये क्विंटलने विकली गेली. सरासरी ४३१० रुपये दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com