Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : सोयाबीन, कांदा, हरभरा, हळदीच्या किमतीत घट

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्युचर्स किमती ः सप्ताह- २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर, २०२४

१ ऑक्टोबर पासून NCDEX मध्ये फेब्रुवारी २०२५ डिलीवरीसाठी मक्याचे व एप्रिल आणि मे २०२५ डिलीवरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू झाले. यामुळे सध्या NCDEX मध्ये कपाशीचे नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलीवरीसाठी, मक्याचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी डिलीवरीसाठी तर हळदीचे ऑक्टोबर, डिसेंबर, एप्रिल व मे डिलीवरीसाठी व्यवहार चालू आहेत. MCX मध्ये कापसाचे नोव्हेंबर, जानेवारी व मार्च डिलीवरीसाठी व्यवहार उपलब्ध आहेत.

खरीप (व रब्बी) पिकांच्या वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेमुळे आणि वाढत्या आवकेमुळे टोमॅटो वगळता सर्व पिकांच्या किमती या सप्ताहात घसरल्या. कांदा, सोयाबीन, हरभरा, हळद व मूग यातील घट ३ टक्क्यांहून अधिक होती.

४ ऑक्टोबर २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात १.७ टक्क्यांनी घसरून रु. ५८,९०० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा १.८ टक्क्यांनी घसरून रु. ५७,८२० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स भाव १.४ टक्क्यांनी घसरून रु. ५७,२५० वर आले आहेत. जानेवारी फ्युचर्स भाव रु. ५७,८०० वर आले आहेत. ते स्पॉट भावाइतकेच आहेत. भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज हे भाव दर्शवितात. कापसाची आवक वाढू लागली आहे.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १,५८३ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,६०१ वर आले आहेत तर एप्रिल फ्युचर्स रु. १,५८६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ०.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. एप्रिल फ्युचर्स या हमीभावापेक्षा रु. ८२ ने अधिक आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,५२५ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स किमती रु. २,५४९ वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. २,५७९ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २.१ टक्क्यांनी अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मध्ये या महिन्यात हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलीवरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १४,६८७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी घसरून रु. १४,२४० वर आल्या आहेत. डिसेंबर फ्युचर्स किमती ६.९ टक्क्यांनी घसरून रु. १३,७८० वर आल्या आहेत. एप्रिल किमती रु. १३,७८६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ३.२ टक्क्यांनी कमी आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ८,००० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.८ टक्क्यांनी घसरून रु. ७,७०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० जाहीर झाला आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,००० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे. किमती कमी होत आहेत.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ४.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,६४६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,९२३ वर आली होती. या सप्ताहात ती १.३ टक्क्यांनी घसरून रु. ९,७९५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल; पण साठ्यातील आवक वाढती आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ४,६७० होती; या सप्ताहात ती रु. ४,३३० वर आली आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ३,२५० वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. ३,२५० वर आली आहे. आवकेत उतरता कल आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांच्या मदतीची मागणी

Land Dispute : अति उत्साहीपणा आला अंगलट

Crop Loan : रब्बी हंगामात तेराशे कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Crop Insurance : वंचित शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा द्या

Return Monsoon : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसांपासून पुन्हा थबकला

SCROLL FOR NEXT