Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Year 2026: आत्मनिर्भरतेसाठी २०२६ ‘सोया वर्ष’ जाहीर करा

SOPA Demand: सोयाबीन उत्पादकांना चांगला परतावा मिळावा, याकरिता २०२६ हे वर्ष सोयाबीन वर्ष म्हणून जाहीर करावे, अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियासह (सोपा) विविध भागधारकांनी केली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: जागतिकस्तरावर भारत हा सोयाबीनचा पाचवा सर्वांत मोठा उत्पादक असून, उत्पादित सोयाबीनपैकी मोठ्या हिश्‍शावर प्रक्रिया करून त्यापासून तेल काढले जाते. त्याच वेळी प्रोटीन (प्रथिने) असलेल्या अवशेषांची कमी दरात देशातून निर्यात होते.

ही बाब गांभीर्याने घेऊन प्रोटीन घटकांचा आहारात वापर वाढावा त्यातून सोयाबीन उत्पादकांना चांगला परतावा मिळावा, याकरिता २०२६ हे वर्ष सोयाबीन वर्ष म्हणून जाहीर करावे, अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियासह (सोपा) विविध भागधारकांनी केली.

सोपा, सोया खाद्य संवर्धन आणि कल्याण संघ यांच्या वतीने केंद्र सरकारसह निती आयोगाकडे या संबंधाने शिफारस करण्यात आली आहे. शिफारशीत म्हटले आहे, की केंद्र सरकारने सोयाबीनचा वापर खाद्यतेलापुरताच मर्यादित ठेवू नये. त्याबरोबरच देशातील नागरिकांसाठी हा प्रथिनांचा मुख्य स्रोतही ठरणार आहे.

त्याकरिता आहारात आणि रोजच्या नाश्‍त्यात याचा वापर वाढला पाहिजे. यातून देशातील कुपोषणाच्या समस्येवरदेखील मात करता येईल. जागतिकस्तरावर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा पाचवा क्रमांक आहे. या उत्पादित सोयाबीनवर पहिल्या टप्प्यात प्रक्रिया करून त्यापासून तेल मिळविले जाते. या प्रक्रियेतून मिळणाऱ्या प्रोटीन अवशेषांची निर्यात स्वस्त पशुआहार म्हणून होते.

यावरूनच आम्ही पोषणाची निर्यात आणि कुपोषणाची आयात करीत आहोत हे सिद्ध होते. सोयाबीनच्या विविध घटकांचा तांदळासह रोज पोळ्या करण्याकामी लागणाऱ्या पीठातही वापर करता येणार आहे. यापासून टोफू (सोयाबीन पनीर), सोया मिल्क, सोया आटा, सोया दाल असे मूल्यवर्धित पदार्थ मिळणार आहेत. त्यांचा पोषणाचा दर्जाही भक्‍कम आहे. किरकोळ दुकानांसह मध्यान्ह शालेय भोजनात याचा वापर होत आहे. तरी सुद्धा याचा तितकासा वापर वाढला नाही.

रोजच्या आहारात सोया प्रोटीनचा वापर वाढल्यास सोयाबीन क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्यास हातभार लागणार आहे. त्याबरोबरच देशातील सोयाबीन उत्पादकांना चांगला परतावा मिळण्यास मदत होईल. इतकेच नाही तर कुपोषणाची समस्यादेखील बऱ्याच अंशी निकाली निघेल. त्याकरिता २०२६ हे वर्ष सोया वर्ष म्हणून घोषित करावे, अशी मागणी आहे.
डॉ. डी. एन. पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोपा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Internation Agri Market: दापचरी येथील जागेसाठी ११ सदस्यीय समिती

Agriculture Department: आकृतिबंध तयार करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Banana Market: केळीच्या आवकेत किंचित वाढ

Crop Insurance: विमा भरपाईचे ४१५ कोटी आठवडाभरात मिळणार

India Shrimp Export: कोळंबी निर्यातीतील अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT