Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे (ता.वैभववाडी) गांगोचा माळ या परिसराला लागलेल्या वणव्यात अंजनी केगडे यांची १०२ काजू कलमे जळाली. ही आग मंगळवारी (ता.३)दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लागली. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला..जिल्ह्याच्या अनेक भागांत सध्या वणवे लागत आहेत. दोन दिवसांपूर्वी बांदा परिसरात आग लागून आंबा, काजू कलमे जळाली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील गांगोचा माळ परिसराला आग लागली..Cashew Crop Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी काळवंडली.माळरानावरील सुकलेले गवत आणि वारा यामुळे आगीचा भडका उडाला. अवघ्या काही मिनिटांत आग संपूर्ण माळरानावर पसरली. दुपारची वेळ असल्याने माळरानावर लागलेली आग समजण्यास वेळ लागला..Wildfire Prevention: वणवा रोखण्यासाठी वनविभाग सज्ज.त्यामुळे अंजनी केगडे यांच्या काजू बागेत आगीने प्रवेश केला. वाऱ्यामुळे अवघ्या काही क्षणात संपूर्ण बाग जळाली. अंजनी यांची १०२ काजू कलमे पूर्णपणे जळाली. त्यांचे सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे..या बागेतून अन्य भागात देखील आग पसरली. या माळरानावर मोठ्या प्रमाणात काजू लागवड आहे. मात्र ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक घटनास्थळी पाहोचले त्यांनी फवारणी पंपाच्या साहाय्याने आगीवर नियत्रंण मिळविले.त्यामुळे मोठा अनर्थ टळला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.