
Nashik News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने १,००० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे अनुदान द्यावे. तसेच कांदानिर्यातदारांसाठी पूर्वीची १० टक्के निर्यात प्रोत्साहन(MEIS)योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी मुंबई व लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केली.
एकीकडे वातावरणीय बदलांमुळे कांद्याचे नुकसान होत आहे.तर दुसरीकडे दर कोसळले आहेत. अशा परिस्थितीत वाढलेले उत्पादन व निर्यात प्रक्रिया अडचणीत असल्यामुळे बाजारात कांद्याचा साठा अतिरिक्त आहे. परिणामी बाजार समितीमध्ये १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
सध्या ते उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडत नसल्याची स्थिती आहे यापूर्वी केंद्र शासनाकडून निर्यात प्रोत्साहन MEIS (Merchandise Exports from India Scheme) योजनेअंतर्गत कांदा निर्यातदारांना१० टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जात होते; मात्र २०२१पासून ही योजना बंद करण्यात आली आहे. सध्याच्या कांदा निर्यातीवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर ही योजना पुन्हा सुरू केल्यास कांदा निर्यात वाढविण्यास मदत होऊ शकते.
गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा न करता भारतीय कांद्याच्या आयातीवर अघोषित बंदी घातली आहे.त्यामुळे भारतातून बांगलादेशात जाणारी निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे.सन २०२४–२५या आर्थिक वर्षात भारताने बांगलादेशात ४.८० लाख टन कांद्याची निर्यात केली होती. ज्यातून भारताला १७२४ कोटींचे परकीय चलन मिळाले होते. ही बाजारपेठ भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
केंद्र सरकारने सातत्याने केलेल्या हस्तक्षेपामुळे सद्यःस्थितीत केवळ कांदा उत्पादक शेतकरीच नव्हे, तर निर्यातदार, व्यापारी, वाहतूकदार आणि ग्राहक या सगळ्यांसाठीच गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी केंद्र व राज्य सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन,अनुदान आणि निर्यात प्रोत्साहनाच्या उपाययोजना तत्काळ अमलात आणाव्या असे श्री. होळकर यांनी सांगितले.
सुचविलेल्या उपाययोजना व पुढील दिशा
बांगलादेश सरकारशी उच्चस्तरीय चर्चा करून आयात बंदी उठवावी.
पारंपारिक बाजारपेठांवर अवलंबून न राहता, पूर्व आफ्रिका, मध्यपूर्व रशिया, अमेरिका, युरोप, फिलिपिन्स यांसारख्या नव्या बाजारपेठांमध्ये निर्यात यंत्रणा तयार करावी.
नाफेड व एनसीसीएफ या संस्थांनी बाजार समित्यांमध्ये थेट कांदा खरेदी सुरू करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.