Soybean Market Update निलंगा, जि. लातूर : सोयाबीनच्या (Soybean) राशी होऊन सहा महिने झाले असले तरी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बाजारात (Soybean Market) आणण्यात येणारे सोयाबीन बाजारातील भाव (Soybean Rate) कमी व स्थिर असल्याने घरीच साठवून ठेवले आहे.
सोयाबीनचे भाव वाढतील या आशेमुळे होणारी विक्री थंडावली आहे. शेतकरी बाजारात सोयाबीन विक्रीला आणत नाहीत त्यामुळे बाजार समितीत दैनंदिन घटली आहे.
निलंगा तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यंदा अतिवृष्टी व कधी पावसाचा खंड यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे भाव वाढेल या अपेक्षेने शेतकरी प्रतिक्षा करत आहे.
एरवी शेतकऱ्यांकडून मिळेल त्या दरामध्ये सोयाबीनची विक्री केली जाते. अडीच ते तीन-चार हजार रुपये दराने शेतकऱ्यांनी मागील काळात विक्री केली आहे.
गतवर्षी दर चांगले मिळत होते अन् शेतकऱ्यांकडे सोयाबीन नव्हते यामुळे या दराचा फायदा साठवणूक करून ठेवलेल्या खरेदीदारास व्यापाऱ्यांनी घेतला होता.
अनेक व्यापारी मालामाल झाले होते. मात्र यंदा सोयाबीनचे दर वाढतील या आशेमुळे शेतकरी घरांमधून सोयाबीन बाजारात विक्रीला आणण्यास तयार नाहीत.
राज्य सरकारकडून मिळालेले अनुदान व पीकविमा नुकसान भरपाई यावर आपली गरज शेतकरी भागवत आहेत. निलंगा बाजार समितीपेक्षा औरादशहाजानी बाजार समितीमध्ये मोठी आवक असते.
मात्र निलंगा, औरादशहाजानी व कासारशिरसी या बाजारपेठत सोयाबीनची आवक अतिशय नाममात्र झाली आहे. शेतकरी गरजे पुरते तीन चार क्विंटल धान्य आणून विक्री करत आहेत. व आपली गरज भागवत असल्यामुळे निलंगा बाजार समितीत शुकशुकाट दिसत आहे.
सोयाबीन भाव गतवर्षीच्या सुरवातीच्या काळापेक्षा सध्या चांगले आहेत. कमी उत्पादनातील तूट अधिक प्रमाणात भाव मिळाल्यास भरून निघणार आहे. सध्या हरभराही काढणी झाली असून शेतकऱ्यांनी प्रतिक्षा करावी. अडचण असल्यास तूर, हरभरा विक्री करून गरज भागवत आहेत.
- गोविंदराव पाटील, शेतकरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.