Soybean Market : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन निचांकी पातळीवर

अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने सोयापेंड निर्मितीही कमी झाली. अर्जेंटीनातून यंदा सोयापेंड निर्यात कमी होणार आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Soybean Price : जगातील महत्वाच्या सोयापेंड उत्पादक (Soyameal Producer) अर्जेंटीनात यंदा सोयाबीनला दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळे अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन गेल्या २३ वर्षातील निचांकी पातळीवर राहण्याचा अंदाज आहे. तर उत्पादकता ३४ वर्षातील सर्वात कमी मिळाली.

परिणामी यंदा अर्जेंटीनातील सोयापेंड (Soyameal) उत्पादनही कमी राहील. याचा फायदा भारतीय सोयापेंडला मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादनात यंदा विक्रमी वाढ झाली. मात्र ब्राझीलमध्ये सोयाबीनवर खूपच कमी प्रमाणात प्रक्रिया होते. ब्राझीलमधून थेट सोयाबीनची निर्यात केली जाते. चीन ब्राझील आणि अमेरिकेतून सोयाबीन आयात करून देशातच प्रक्रिया करतो.

Soybean Market
Soyameal Export : फेब्रुवारी, मार्चमध्ये ५ लाख टन सोयापेंड निर्यातीची शक्यता

त्यामुळे ब्राझील सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असूनही सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत पिढाडीवर आहे. सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत अर्जेंटीना आघाडीवर आहे.

अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढ आणि घटीचा जागतिक सोयापेंड आणि सोयातेल बाजावर लगेच परिणाम जाणवतो.

यंदा अर्जेंटीनाला दुष्काळाचा फटका बसत आहे. चालू हंगामाच्या सुरुवातीला अर्जेंटीनात ५१० लाख टन उत्पादनाचे उद्दीष्ट होते. पण दुष्काळाने त्यावर पाणी फेरले. अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली.

युएसडीएने यंदा अर्जेंटीनात ३३० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. पण अर्जंटीनाच्या ब्यूनस आयर्स ग्रेन्स एक्सचेंजने उत्पादन २५० लाख टनांवरच स्थिरावेल, असे म्हटले आहे.

Soybean Market
Soybean Market : अमेरिकेचे सोयाबीन गाळप फेब्रुवारीत घटले

एक्सचेंजने यापुर्वी २९० लाख टनांचा अंदाज व्यक्त केला होता. त्यात आता पुन्हा ४० लाख टनांची कपात करण्यात आली. म्हणजेच यंदा २५० लाख टनांचे उत्पादन होईल. यंदाचे उत्पादन गेल्या २३ वर्षांतील निचांकी असेल. यापुर्वी १९९९-२० मध्ये २०१ लाख टन उत्पादन झाले होते.

पण त्यावेळी सोयाबीन पीक ८८ लाख हेक्टरवर होते. तर यंदा १६२ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. उत्पादकतेचा विचार करता, अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादकता ३४ वर्षांतील निचांकी पातळीवर पोचली.

भारतीय सोयापेंडला उठाव

अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने सोयापेंड निर्मितीही कमी झाली. अर्जेंटीनातून यंदा सोयापेंड निर्यात कमी होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडला चांगला दर मिळतोय. सध्या अर्जेंटीनातील सोयापेंड ६०८ डाॅलर प्रतिटनाने मिळतो.

तर भारतीय सोयापेंड ५६० डाॅलरवर आहेत. त्यामुळे भारतीय सोयापेंडला चांगला उठाव आहे. यंदा देशात सोयापेंड उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे सोयापेंड निर्यात वाढल्याचा फायदा सोयाबीन बाजाराला होऊ शकतो, असा अंदाज निर्यादारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com