Cotton, Soybean market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीनच्या किमतींत घट

कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर होती. या महिन्यात हळद, हरभरा, कांदा यांची आवक वाढती राहील.

Team Agrowon

Cotton Soybean Market फेब्रुवारी महिन्यात मूग, मका, सोयाबीन (Soybean) व तूर यांची आवक (Tur Arrival) उतरती होती. हळद, हरभरा, कांदा व टोमॅटो यांची आवक वाढू लागली आहे. कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत्या पातळीवर स्थिर होती. या महिन्यात हळद, हरभरा, कांदा यांची आवक (Onion Arrival) वाढती राहील.

फेब्रुवारी महिन्यात हरभरा व तूर यांच्या किमतीत वाढीचा कल दिसून आला. कापूस, मका, हळद, सोयाबीन व कांदा यांच्या किमती उतरत होत्या. मुगाची किमत स्थिर होती; टोमॅटोची किंमत कमी पातळीवर स्थिर होती.

NCDEX मध्ये १ तारखेपासून २० जुलै डिलिव्हरीसाठी मक्याचे फ्यूचर्स व्यवहार सुरू झाले. सोयापेंड आणि मोहरीच्या पेंडीची निर्यात गेल्या वर्षाच्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

२४ फेब्रुवारी रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.१ टक्क्याने घसरून प्रति खंडी रु. ६२,६८० वर आले होते. याही सप्ताहात ते ०.२ टक्क्याने घसरून रु. ६२,५८० वर आले.

एप्रिल फ्यूचर्स भाव ०.४ टक्क्याने घसरून रु. ६३,५०० वर आले आहेत. जून फ्यूचर्स रु. ६४,१०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.४ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु १,५७२ वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.४ टक्क्याने घसरून रु. १,५५४ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५९५ आहेत.

कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० (रु. १,२७६ प्रति २० किलो) व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० (रु. १,२१६ प्रति २० किलो) जाहीर झाले आहेत. सध्याचे बाजार भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. कापसाची आवक अजून वाढत्या पातळीवर आहे.

मका

NCDEX मधील मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा, सांगली) जानेवरी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या याच पातळीवर स्थिर आहेत.

फ्यूचर्स (एप्रिल डिलिव्हरी) किमती रु. २,१२० वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,१४५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.१ टक्क्यांनी अधिक आहेत.

मक्याचे हमीभाव रु. १,९६२ जाहीर झाला आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. मक्याची आवक घसरती आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.१ टक्क्याने घसरून रु. ६,९८५ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ६,९२४ वर आल्या आहेत.

एप्रिल फ्यूचर्स किमती १.७ टक्क्याने घसरून रु. ६,९७० वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. ७,११८ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. आवक हळूहळू वाढत आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात सप्ताहात १.१ टक्क्याने वाढून रु. ४,७०० वर आल्या होत्या. याही सप्ताहात त्या १.१ टक्क्याने वाढून ४,७५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचे हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. आवक गेल्या तीन सप्ताहांत वाढू लागली आहे.

मूग

मुगाच्या स्पॉट किमती फेब्रुवारी महिन्यात स्थिर होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ८,००० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती फेब्रुवारी महिन्यात कमी होत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) १.६ टक्क्याने घसरून रु. ५,५३० वर आली होती.

या सप्ताहात ती पुन्हा १.४ टक्क्याने घसरून ५,४५४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ७,३४० वर आली होती. याही सप्ताहात ती ०.४ टक्क्याने घसरून रु. ७,३०८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे. तुरीची बाजार समितीतील आवक गेल्या तीन सप्ताहांत घसरत आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT