Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : कापसाच्या दरात नरमाईचा कल

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्युचर्स किमती ः सप्ताह १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२४

ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची आवक सुरू होईल. एकूण वार्षिक आवकेतील ३८ टक्के आवक ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात होते. मक्याची मागणी चांगली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत गेली काही वर्षे वाढीचा कल होता; तो या वर्षीही कायम राहण्याचा अंदाज आहे. तूर, सोयाबीन व मूग यांच्या किमती सध्या कमी होत आहेत; पुढील काही दिवस त्या हाच कल दाखवतील.

२० सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मध्ये या महिन्यात कापसासाठी सप्टेंबर, नोव्हेंबर, जानेवारी व मार्च डिलीव्हरी व्यवहार सुरू आहेत. स्पॉट बाजारात कापसाची आवक कमी होत आहे. किमतीत वाढता कल आहे. कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.६ टक्क्यांनी कमी होऊन रु. ५९,७६० वर आले होते.

या सप्ताहात ते ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ५९,९२० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स भाव १ टक्क्यांनी घसरून रु. ५७,७५० वर आले आहेत. जानेवारी फ्युचर्स भाव रु. ५८,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.२ टक्क्यांनी कमी आहेत. भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज हे भाव दर्शवितात. नवीन कापसाची आवक नोव्हेंबर पासून सुरू होईल.

NCDEX मध्ये या महिन्यात कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलीव्हरी व्यवहार सुरू आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात रु. १,६०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,५८३ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,६२७ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे या वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यांसाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यांसाठी रु. ७,५२१ आहेत. एप्रिल फ्युचर्स या हमीभावापेक्षा जवळ जवळ रु. १०० ने अधिक आहेत.

मका

NCDEX मध्ये या महिन्यात मक्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलीव्हरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,५५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,५५० वरच टिकून आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स किमती रु. २,५६४ वर आल्या आहेत.

डिसेंबर फ्युचर्स रु. २,५८१ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.२ टक्क्यांनी अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. या वर्षासाठी हमी भाव रु. २,२२५ आहेत. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत; हे किती अधिक आहेत ते बघून हेजिंगचा विचार करावा.

हळद

NCDEX मध्ये या महिन्यात हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलीव्हरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १४,४८४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. १४,५८२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स किमती रु. १४,४१४ वर आल्या आहेत. डिसेंबर किमती रु. १४,७७८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.२ टक्क्यांनी अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ७,५५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ७,६०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे; भाव वाढत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,२७५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. किमती कमी होत आहेत.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत(अकोला) ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,७७२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे; आवकसुद्धा कमी होत आहे. नवीन पिकाची आवक ऑक्टोबर मध्ये सुरू होईल.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,०५५ वर आली होती. या सप्ताहात ती १.५ टक्क्यांनी घसरून रु. ९,९०० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ३,९१३ होती; या सप्ताहात ती रु. ४,६३५ वर आली आहे. कांद्याच्या किमतीत वाढता तर आवकेत उतरता कल आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,६०० वर आली होती. या सप्ताहात सुद्धा ती वाढून रु. २,१२५ वर आली आहे. आवकेत उतरता कल आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nuksan Bharpai : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारने दिली २३७ कोटींच्या मदत निधीला मंजुरी

Water Projects : चाळीसगावातील नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

Revenue Department : दीडशे गावांची जबाबदारी अवघ्या १२ तलाठ्यांवर

Water Scarcity : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम

SCROLL FOR NEXT