Pune News : कापसाला उठाव कमी झाल्याचा परिणाम भावावर झाला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वच देशांमध्ये कापसाचे भाव कमी झाले आहेत. तर काही देशांमध्ये कापसाचे भाव निचांकी पातळीवरही पोचले आहेत. अमेरिका, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत या देशांमध्ये सध्या कापसाचे भाव नरमले आहेत.
जगभरातील वायदेबाजारात कापूस भावात मंदी आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत सर्वच देशांमध्ये कापसाचे भाव ऑगस्ट महिन्यात कमी झाले. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंज अर्थात आयसीईवर कापसाचे वायदे ऑगस्ट महिन्यात सतत ७० सेंट प्रतिपाऊंडच्या खाली राहीले. जुलैच्या मध्यात आसीईवर कापसेच वायदे ७० सेंट होते. यापुर्वी ७० सेंट हा भाव नोव्हेंबर २०२० मध्ये मिळाला होता. विशेष म्हणजेच ए इंडेक्स नोव्हेंबर २०२० नंतर पहिल्यांच ८० सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमी पातळीवर पोचला.
चीनमध्येही कापसाच्या भावात नरमाई आली. चीन काॅटन इंडेक्स जूनमध्ये १०० सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमी पातळीवर पोचला. जुलैमध्येही जुलैमधील कापसाच्या भावातील नरमाई कायम होत. जुलैमध्ये चीन काॅटन इंडेक्स ९३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचला होता. चीनमध्ये कापसाचे भाव १४ हजार ७०० आरएमबी म्हणजेच रॅन्मिन्बीपर्यंत कमी झाले. रॅन्मिन्बी हे चीनचे युआन चलन म्हणून ओळखले जाते. रॅन्मिन्बीच्या तुलनेत डाॅलरचा भाव वाढल्याने चीनमध्ये कापसाचे भाव कमी झाले.
भारतातही भाव नरमले
भारतातही कापसाचे भाव कमी झाले आहेत. भारतात शेतकऱ्यांकडील कापूस संपला आहे. सध्या व्यापारी आणि जिनिंग यांच्याकडे कापूस आहे. तसेच वायदे बाजारातही कापसाचे भाव कमी झाले. एनसीडीईएक्सवर शंकर ६ वाणाचे भाव कमी ८८ सेंट प्रतिपाऊंडवरून कमी होऊन ८६ सेंट प्रतिपाऊंडवर आले. तर एमसीएक्सवर कापसाचे वायदे ५८ हजार रुपयांवरून कमी होऊन ५६ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर आले आहेत.
पाकिस्तानमध्ये कापूस स्वस्त
पाकिस्तानचे रुपयाही डाॅलरच्या तुलनेत स्वस्त झाला. एक डाॅलर आता २७९ पाकिस्तानी रुपयावर पोचला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा कापूसही स्वस्त पडत आहे. पाकिस्तानमधील कापसाचे स्पाॅटचे भाव ८० सेंट प्रतिपाऊंडवरून कमी होऊन ७६ सेंट प्रतिपाऊंडवर आले. तर पाकिस्तानमधील कापसाचे स्थानिक भाव १८ हजार ३०० रुपये प्रतिमणावरून कमी झाले असून १७ हजार ४०० रुपये प्रतिमणावर आले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.