Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Production : कापूस उत्पादन यंदा ७ टक्क्यांनी घटणार

Cotton Market Update : देशातील १० टक्क्यांनी कमी झालेली लागवड आणि पिकाचे झालेले नुकसान यामुळे कापूस उत्पादन यंदा ७ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील १० टक्क्यांनी कमी झालेली लागवड आणि पिकाचे झालेले नुकसान यामुळे कापूस उत्पादन यंदा ७ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादन यंदा ३०२ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. तर निर्यात कमी राहून आयात वाढू शकते, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने २०२४-२५ च्या हंगामाचा पहिला अंदाज व्यक्त केला. गेल्या वर्षी देशातील कापूस उत्पादन ३२५ लाख गाठी होते. त्यात यंदा २३ लाख गाठींची घट होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामातील उत्पादन ३०२ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला.

चालू हंगामात गेल्या हंगामातील शिल्लक साठा ३० लाख गाठींवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शिल्लक साठा काहीसा अधिक आहे. देशातील उत्पादन घटले तरी वापर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आयात वाढणार आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात भारताने १७ लाख ५० हजार गाठी आयात केली होती. चालू हंगामात भारत २५ लाख गाठी कापूस आयात करण्याची शक्यता आहे. कापूस आयातीत यंदा ७.५ लाख गाठींची वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा देशातून कापूस निर्यात कमी राहण्याचा अंदाज आहे. नुकत्याच सरलेल्या हंगामात भारताने २८ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात केली होती. यंदा कापूस उत्पादनात घटीचा अंदाज आहे, तर कापूस निर्यात १८ लाख गाठींवरच स्थिरावेल, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला.

गुजरातमध्ये यंदा मोठी घट

उत्तर भारत आणि गुजरातमध्ये उत्पादनातील घट जास्त आहे. गेल्या हंगामात गुजरातमध्ये ९० लाख ५० हजार गाठी उत्पादन झाले होते. यंदा उत्पादन ८० लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. म्हणजेच उत्पादनात १० लाख ५० हजार गाठींची घट होण्याचा अंदाज आहे. पंजाब, हरियाना, राजस्थानमधील उत्पादनात ९ लाख ६२ हजार गाठींची घट होणार आहे. महाराष्ट्रातही उत्पादन काहीसे कमी होईल. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. ओडिशातील उत्पादनातही घट होईल, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला.

२०२४-२५ मधील कापूस ताळेबंद (लाख गाठींत)

उत्पादन ३०२.२५

शिल्लक साठा ३०.१९

आयात २५

एकूण पुरवठा ३५७.४४

वापर ३१३

निर्यात १८

शेवटी शिल्लक २६.४४

राज्यनिहाय उत्पादनातील

घट (लाख गाठींत)

राज्य घट

गुजरात १०.५०

राजस्थान ७.६७

हरियाना १.३०

तेलंगणा १

आंध्र प्रदेश १

पंजाब ०.६५

महाराष्ट्र ०.५५

ओडिशा ०.५२

तमिळनाडू ०.२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT