Cotton  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : कापसाची खेडा खरेदी सहा हजारांपासून सुरू

Cotton Market : यंदा बाजारात कापूस सध्या खेडा खरेदीत ६००० ते ६९०० दरम्यान विकतो होत आहे.

 गोपाल हागे

Akola News : विधानसभेच्या रणधुमाळीत सोयाबीनच्या दरांनी या वेळी राजकारण्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र बाजारपेठेत कापसाचा विषय तितकासा गाजला नाही. यंदा बाजारात कापूस सध्या खेडा खरेदीत ६००० ते ६९०० दरम्यान विकतो होत आहे. एवढ्या दरात शेतकऱ्यांचा जेमतेम खर्च भागत असून, उत्पन्न फारसे शिल्लक राहत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रमुख पिकाच्या भावाकडे राजकारण्यांनी तितकेसे लक्ष दिल्याचे दिसून आलेले नाही.

यंदाच्या कापूस हंगामाला गेल्या १५ दिवसांत चांगला वेग आला. ‘सीसीआय’ने कापूस खरेदीला सुरुवात केली. या केंद्रांवर आर्द्रतेचे प्रमाण योग्य असेल तर ७४७१ रुपये दर मिळू शकतो. हे प्रमाण वाढलेले असेल तर ७१७१ रुपये दर दिल्या जात आहे. दुसरीकडे कापसाची खेडा खरेदी ही सहा हजारांपासून ६९०० पर्यंत केली जात आहे. चांगल्या दर्जाचा कापूस खेडा खरेदीत सरासरी ६८०० ते ६९०० दरम्यान विकतो आहे. दुय्यम दर्जाचा कापूस सहा हजारांपासूनच व्यापारी मागत आहेत.

यंदा सततच्या पावसाने सिंचनाधारित कापूस उत्पादन क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले. दसऱ्याच्या दरम्यान झालेल्या पावसाने कपाशीचे परिपक्व बोंड खराब झाले होते. एक क्विंटल कापूस उत्पादनासाठी सध्या खर्चाचे प्रमाण हे चार हजारांपासून साडेपाच हजारांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यात उत्पादकता अधिक मिळाली तरच कापूस उत्पादक शेतकऱ्याला थोडाफार नफा पदरात पडत असतो.

यंदा सरासरी उत्पादकता पाच ते सहा क्विंटलदरम्यान आहे. कोरडवाहू क्षेत्रात ही उत्पादकता किती येईल या बाबत सध्या कुठलाही अंदाज दिला जात नाही. त्यातच खारपाण पट्ट्यात कपाशीच्या पिकावर तंबाखूची पाने खाणारी अळी आहे. पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. या अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी महागडी कीडनाशके फवारत आहेत. यामुळे पुन्हा व्यवस्थापनाच्या खर्चात भर पडली.

देशात गुजरात, पंजाब, हरियाना, तेलंगणा या भागांतील कापूस उत्पादकांना शासनाचा आधार अधिक मिळतो. तेथे कापूस पिकाला सुविधा आहेत. जमीन, सिंचनाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. उलट महाराष्ट्रातील शेती निसर्ग आधारित आहे. ८० टक्के कोरडवाहू पट्टा आहे. त्यामुळे राज्यात कापूस उत्पादन खर्च अधिक आहे. शासन कापसाचा हमीभाव काढताना वरील राज्यातील सरासरीचा आधार घेतो. मात्र महाराष्ट्रात खर्च अधिक व उत्पादन कमी आहे. आता राज्यात एक क्विंटल कापसाचा उत्पादन खर्च हा सध्या मिळत असलेल्या भावाच्या ६० ते ७० टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच २५ ते ३० टक्केच उत्पन्नाची सीमा आहे. त्यातही नैसर्गिक आपत्ती आली तर हे प्रमाण कमी होते. या मुद्यांकडे कधी गांभिर्याने लक्षच दिल्या जात नाही.
गणेश नानोटे, कापूस उत्पादक, निंभारा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT