Kharif Season: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीत होणाऱ्या अनियमितता आणि काळाबाजाराला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहिमेत आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे ४५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर ९ केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे..जिल्ह्यातील सर्व १११ कृषी केंद्रांची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाने १५ भरारी पथके नियुक्त केली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्री केंद्रांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच निकृष्ट अथवा प्रतिबंधित निविष्ठांची विक्री रोखण्यासाठी विभागाने कठोर भूमिका घेतली आहे..Agriculture Department Inspection: जादा युरिया विक्रीच्या १६ हजार व्यवहारांची चौकशी.तपासणीदरम्यान अनेक केंद्रांमध्ये परवान्यांचे नूतनीकरण न करणे, स्टॉक नोंदी अद्ययावत न ठेवणे, दर्शनी भागावर आवश्यक माहिती न लावणे, ई-पॉस यंत्राचा वापर न करणे, पक्की पावती न देणे तसेच खतांची अतिरिक्त दराने विक्री करणे यासारख्या अनियमितता आढळून आल्या. काही ठिकाणी बियाणे व कीटकनाशकांचा साठा नियमबाह्य पद्धतीने ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. कारवाईअंतर्गत १५ बियाणे विक्रेते, २२ खत विक्रेते आणि ११ कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय ३ बियाणे विक्रेते, ३ खत विक्रेते आणि ३ कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी दिली. खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कृषी निविष्ठांची खरेदी करतात..Agriculture Department Inspection: निविष्ठा विक्रीतील गैरप्रकारांवर अंकुश?.याच काळात काही विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, अतिरिक्त दर आकारणे किंवा दिशाभूल करणारी विक्री केली जाते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे..जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे म्हणाले, "शेतकऱ्यांना दर्जेदार आणि योग्य दरातील कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, हा विभागाचा मुख्य उद्देश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कृषी केंद्राविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.".कारवाई दृष्टिक्षेपाततपासणीसाठी नियुक्त भरारी पथके : १५तपासणीच्या कक्षेत कृषी केंद्रे : १११निलंबित परवाने : ४५बियाणे विक्रेते : १५खत विक्रेते : २२कीटकनाशक विक्रेते : ११रद्द परवाने : ९बियाणे विक्रेते : ३खत विक्रेते : ३कीटकनाशक विक्रेते : ३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.