Cotton Procurement : परभणी बाजार समितीत खासगी कापूस खरेदी

Cotton Market : परभणी बाजार समिती शेतकऱ्यांचे हितासाठी सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांनी ओला कापूस विक्रीस आणू नये.
Cotton Procurement
Cotton ProcurementAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी.एम.सी.मार्केट यार्डावर सोमवारपासून (ता.१८) जाहीर लिलावाद्वारे खासगी कापूस खरेदीस सुरुवात होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर यांनी दिली.

बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डावर कापूस विक्रीसाठी आणलेली वाहने क्रमवारपणे लावावीत. जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या बाबतची सौदापट्टी घेऊन संबंधित जिनिंगवर आपली वाहने घेऊन जावीत.

Cotton Procurement
Cotton Market : नांदेड बाजार समितीकडून कापूस खरेदी सुरू

कोणत्याही प्रकारे जिनिंग आवारात परस्पर वाहने घेऊन जाऊ नयेत. दुपारी १२ वाजेपर्यंत टी.एम.सी.मार्केट यार्डात आणावीत. उशिराने येणाऱ्या वाहनधारकांची निश्चितच गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Cotton Procurement
Cotton Market : कापसाची आयात करू नका; अग्निहोत्रींची मागणी

परभणी बाजार समिती शेतकऱ्यांचे हितासाठी सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांनी ओला कापूस विक्रीस आणू नये. स्वच्छ स्वरूपात विक्रीस आणावा. चांगल्या प्रतीचा कापूस हा वेगळा व खराब प्रतीचा कापूस वेगळा करून आणल्यास बाजार भावाबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही.

कापसाला जास्तीत जास्त बाजार भाव मिळेल. शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना जाहीर लिलावाद्वारे कापूस विक्रीसाठी बाजार समितीच्या टी.एम.सी.मार्केट यार्डात आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, सर्व संचालक मंडळ, सचिव संजय तळणीकर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com