Cotton Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Production : नैसर्गिक आपत्तीने कापूस पीक संकटात

देशात जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबी बोंडअळीचा शिरकावही पिकात दिसत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

जळगाव : देशात जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने कापूस पिकाचे मोठे नुकसान (Cotton Crop Damage Due To Heavy Rain) झाले आहे. गुलाबी बोंडअळीचा (Pink Bollworm Outbreak) शिरकावही पिकात दिसत आहे. याचवेळी जगातील सर्वात मोठा निर्यातदार (Cotton Exporter) असलेल्या अमेरिकेतही नैसर्गिक आपत्तीने कापूस पिकाची (Crop Damage Due To Natural Calamity) हानी झाली आहे. जगभरात कापूस लागवडीत (Cotton Cultivation) वाढ दिसत आहे. पण विविध समस्यांमुळे कापूस उत्पादनात मोठी घट होईल, असे जाणकारांचे मत आहे.

सर्वाधिक कापूस लागवड भारतात केली जाते. देशात यंदा लागवड १० टक्क्यांनी वाढून १३५ लाख हेक्टरवर होईल. अमेरिकेत सुमारे ४२ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. चीनमध्ये ३३ लाख हेक्टरवर कापूस पीक आहे. पाकिस्तानात २५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यात अमेरिका, चीन व पाकिस्तानसह देशातील उत्तरेकडे कापसाची नव्या हंगामातून आवक सुरू झाली आहे. पाकिस्तानात १२५ लाख गाठींचे एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन शक्य आहे. पण तेथेही कापसाची आयात करावी लागेल. तेथे चीनने गुंतवणूक केल्याने आयात सात ते आठ लाख गाठी एवढी केली जाईल.

चीनमध्ये ३५० लाख गाठींचे उत्पादन शक्य आहे. तर अमेरिकेत २२० ते २२५ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. पण टेक्सास व इतर कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळ, टंचाई, नैसर्गिक समस्या यंदाही आल्या आहेत. अमेरिकेत टेक्सासमध्ये ४० टक्के फटका पिकाला बसला असून, अमेरिकेत एकूण २० टक्के उत्पादन कमी येईल. तेथे मागील हंगामातही टेक्सासमध्ये दुष्काळी स्थिती होती. अमेरिकेतील सिंचन प्रकल्प तेथील सरकारने ताब्यात घेतले होते. पाणी वापरावर बंधने होती. यंदाही अशीच स्थिती तेथे होती. यामुळे अमेरिकेतील कापूस हंगामाला फटका बसला आहे. तेथून नव्या हंगामातील कापसाची निर्यात सुरू झाली आहे.

व्हीएतनामशी अमेरिकेतील निर्यातदारांचे अधिकचे सौदे होत आहेत. पण तेथील उत्पादन १९० लाख गाठी एवढेच राहू शकते. भारतातही ४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. परंतु गुजरात, महाराष्ट्र व तेलंगणातील पूर्वहंगामी (बागायती) व कोरडवाहू कापूस पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. विदर्भ, खानदेशात पिकात गुलाबी बोंड अळीच्या तक्रारी येत आहेत. या स्थितीत कोरडवाहू कापूस पिकातून हवे तेवढे व उत्तम दर्जाचे उत्पादन साध्य करणे अशक्य होईल. या भागात उत्पादन खर्चही वाढत आहे. यामुळे ४०० लाख गाठींचे उत्पादन देशात शक्य नाही, असे जाणकारांचे मत आहे. भारत व अमेरिका या प्रमुख कापूस उत्पादक व निर्यातदार देशांत कापूस पिकासाठी अनुकूल स्थिती नाही. यामुळे कापसासंबंधी जून, जुलैमध्ये व्यक्त करण्यात आलेले विविध संस्थांचे अंदाज, ताळेबंद चुकतील, त्यात मोठे बदल होतील, असेही दिसत आहे.

नुकसान वाढण्याचा अंदाज

महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरातेत अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाल्याने देशातील उत्पादनातही घट येईल. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. यातच उत्तरेकडे ५० ते ५५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. तेथे प्रमुख बाजारांत कापूस आवक सुरू आहे. पण पंजाब, हरियाना, राजस्थानात पिकात गुलाबी बोंडअळीचा शिरकाव झाला आहे. यामुळे नुकसानीची पातळी वाढून उत्पादनाला फटका बसेल, असे सांगण्यात आले.

अशी राहील देशातील कापूस लागवड

महाराष्ट्रात कापूस लागवड ४२ लाख हेक्टरवर अपेक्षित आहे. गुजरातमध्ये ते सुमारे २७ लाख हेक्टर, उत्तरेकडील कापसाचे क्षेत्र सुमारे १५ लाख हेक्टर असेल आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुमारे ३५ लाख ४० हजार हेक्टरवर कापूस पीक राहील. यात तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात या भागातील स्थितीवर देशातील कापूस हंगामाची भिस्त आहे.

चीन करणार पाच लाख टन कापूस आयात, भारतातही उठाव राहणार

चीनने आपल्या देशातील साठ्यात वाढ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून तीन ते पाच लाख टन कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चीन किमान ८०० ते ९०० कोटी किलोग्रॅम सूत भारतातून घेईल. यातच चीनमध्ये पीक नियोजनावर काम केले जाते. यामुळे तेथे कापूस उत्पादन वाढविणे शक्य नाही. चीन-अमेरिकेत शीतयुद्ध सुरू आहे. पण चीनने पाकिस्तान, बांगलादेशातील वस्त्रोद्योगात गुंतवणूक केली आहे. यामुळे चीन कापूस आयात करील, अशी माहिती जाणकारांनी दिली. तसेच बांगलादेशात अपवाद वगळता कापूस उत्पादन घेतले जात नाही. तेथे १०० लाख गाठींची गरज आहे. ही गरज अमेरिका, आफ्रिकन देश व भारताकडून कापूस आयात करून बांगलादेश पूर्ण करील. तसेच भारतीय वस्त्रोद्योगाला ३२० लाख गाठींची आवश्यकता आहे. या स्थितीत कापूस दरांवर आलेला दबाव काही दिवस राहील. उद्योगाने गती घेतल्यानंतर हा दबाव दूर होईल.

जगातील साठा, हाच मुद्दा

जगात मागील तीन महिने कापूस साठ्याचा मुद्दा चर्चेत आहे. जगात सुमारे १८ दशलक्ष टन कापसाचा साठा आहे. तर देशात ४७ लाख गाठींचा साठा आहे. हा साठा अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्याने व कापूस आयातीला संधी मिळाल्याने देशात कापूस दरात अपेक्षित वाढ सध्या दिसत नाही. परंतु कापूस नुकसानीने आवक कमी राहील. परिणामी साठ्याचा वापर होईल. साठा जसा कमी दिसेल, तशी दरवाढ अपेक्षित आहे, असे जाणकारांचे मत आहे.

ठळक बाबी

- देशातील कापूस लागवडीत १० टक्के वाढ, क्षेत्र १३५ लाख हेक्टरवर पोचणार

- गुजरात, तेलंगण, महाराष्ट्रातील कापूस पट्ट्यात अतिवृष्टी, यात कापसाचे नुकसान झाले आहे

- अमेरिकेत यंदाच्या हंगामात (२०२२-२३) उत्पादनात ४० टक्के घट शक्य

- जगभरातील लागवड अधिक दिसत असल्याने कापूस दरात किंचित घसरण

- चीनकडून रुई व सुताला मागणी राहील. भारताकडे चीन त्यासाठी प्राधान्य देईल.

- बांगलादेश भारताकडून २५ ते २७ लाख गाठींची आयात करणार

- चीन-अमेरिकेतील शीतयुद्ध, मंदी व रशिया - युक्रेन युद्धाचे वस्त्रोद्योगावर सावट शक्य

दर १० वर्षात कापूस पिकात नवे वाण, बियाण्याचे तंत्रज्ञान आले पाहिजे. पण त्यावर काम देशात केले जात नाही. यातच यंदा देशात महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरातेत अतिवृष्टीने पीकहानी मोठी झाली आहे. विदर्भात मोठे नुकसान आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ४० टक्के कापूस पीक दुष्काळाने हातचे गेले आहे. कापूस बाजार सध्या स्थिर दिसत असला तरी पुढे त्यात चांगली वाढ होईल. चांगले दर कापसाला यंदाही मिळतील.
अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT