Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाखेगाव व अलीपूर या दोन गावांतील सुमारे २६० शेतकऱ्यांच्या १२८.७५ हेक्टर वरील कपाशीच्या पिकाला ‘मर’चा फटका बसल्याचे कृषी विभागाने तहसीलदारांना दिलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. लाखेगाव शिवारातील कपाशी पिकाच्या नुकसानीवर ‘ॲग्रोवन’ने विशेष प्रकाश टाकला होता..पैठण तालुक्यातील आडुळ मंडळात आकस्मिक मरमुळे कपाशी पिकावर मोठे संकट ओढावले होते. माहितीनुसार, यंदा जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेषकरून पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात ४०० ते ४५० एकर क्षेत्रावरील कापूस पीक आकस्मिक मर या रोगामुळे ग्रासल्याचे पुढे आले होते. कृषी विभागाच्या वतीने बुधवारी (ता. २०) कळविलेल्या माहितीनुसार लाखेगाव शिवारातील १७७ शेतकऱ्यांच्या ९१.७३ हेक्टर आर. क्षेत्रावरील कपाशीचे पीक ‘मर’मुळे हातचे गेले आहे..Cotton Crop Disease : कापूस पिकावरील दहिया रोगाचे नियंत्रण.याशिवाय अलीपूर शिवारातील शेतकऱ्यांच्या ३६.८२ हेक्टर मधील कपाशीचा ‘मर’मुळे हंगाम वाया गेला आहे. लाखेगाव शिवारात सुमारे ४८ टक्के नुकसान झाले असून अलीपूर शिवारातील नुकसानीचे प्रमाण ५२ टक्के इतके आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळणे विषयी कृषी विभागाने तहसीलदार यांना दिलेल्या पत्राच्या प्रतिलिपी ग्रामपंचायत लाखेगाव व अलिपूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत..Cotton Disease Management : कपाशीतील आकस्मिक मर व्यवस्थापन.याविषयी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तहसीलदार यांच्याकडून प्रत्यक्ष पंचमाने करण्याचे आदेश आल्यानंतर तशी पावली उचलली जातील असे सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानी विषयी काय हालचाली तत्परतेने केल्या जातात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे..लाखेगाव परिसरातील कपाशी पिकावर झालेला आकस्मिक रोग हा शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावीच, परंतु या रोगाचे नेमके कारण व पुढील हंगामासाठी ठोस उपाययोजना आणि मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना वेळेवर माहिती, रोगप्रतिरोधक बियाणे आणि योग्य सल्ला मिळाला तर अशा संकटावर मात करता येईल.”बालचंद घुणावत, कृषिभूषण, लाखेगाव, ता. पैठण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.