Cotton Rate : काॅटनऐवजी पाॅलिस्टर कपड्यांना वाढतेय पसंती !

Anil Jadhao 

कापूस पिकाचं उत्पादन घेण्यामागे कापड निर्मिती हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. काॅटनच्या कपड्यांना विशेष मागणी असते. मात्र जगभरातील एकूण कापड उत्पादनात पाॅलिस्टर कापडाचे प्रमाण जास्त आहे.

Cotton Fabric | Agrowon

एका अहवालानुसार जगात २०१५ मध्ये २४० लाख टन कापसापासून निर्मित कापडाचं उत्पादन झालं होतं. ते कापूस उत्पादन घटीमुळं २०२० मध्ये २२७ लाख टनांपर्यंत कमी झालं. २०२१ मध्ये कापसापासून निर्मित कापडाचं उत्पादन २६० लाख टनांवर पोचलं. तर २०२५ पर्यंत या कापडाचं उत्पादन २७० लाख टनांपर्यंत पोचेल, असा अंदाज आहे.

Cotton Fabric | Agrowon

कापसापासून निर्मित कापडाचं प्रमाण एकूण जागतिक कापड उत्पादनात २०१५ मध्ये २८.५७ टक्क्यांवर होता. तो २०२५ मध्ये २४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. जगात कापड्यांची मागणी वाढेल मात्र त्याचा जास्तीत जास्त वाटा पाॅलिस्टर काबीज करेल, असा अंदाज आहे.

Cotton Fabric | Agrowon

पाॅलिस्टरच्या कपड्यांना अलिकडच्या काळात पसंती वाढली आहे. त्यामुळं सहाजिकच पाॅलिस्टरला मागणीही वाढली. जगात २०१५ पर्यंत ४४६ लाख टन पाॅलिस्टर कापडाची निर्मिती झाली होती. त्यानंतर या कापडाची मागणी आणि उत्पादनही वाढत राहीलं.

Polyester Fabric | Agrowon

२०२१ मध्ये पालिस्टर कापडाचं उत्पादन ५५७ लाख टनांवर पोचलं. तर २०२५ पर्यंत पाॅलिस्टर कपड्याचं उत्पादन ५६३ लाख टनांपर्यंत स्थिरावेल, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आलाय.

Polyester Fabric | Agrowon

पाॅलिस्टर कापडचं एकूण कापड उत्पादनातील प्रमाण ५२ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांपर्यंत पोचलं. मात्र २०२५ पर्यंत हे प्रमाण ५६ टक्क्यांपर्यंत घसरु शकतं, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Polyester Fabric | Agrowon
cta image
येथे क्लिक करा