Sugar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : साखर उत्पादन आणि निर्यातीतही ब्राझील अग्रस्‍थानी राहणार

Brazil Sugar Production : यंदाचा साखर हंगाम ब्राझीलला चांगलाच फलदायी होण्याची चिन्हे आहेत. यंदा ब्राझीलमध्ये साखर उत्पादनाबरोबरच निर्यातही उच्‍चांकी होईल अशी शक्यता आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदाचा साखर हंगाम ब्राझीलला चांगलाच फलदायी होण्याची चिन्हे आहेत. यंदा ब्राझीलमध्ये साखर उत्पादनाबरोबरच निर्यातही उच्‍चांकी होईल अशी शक्यता आहे. सध्या तेथील हंगाम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यामुळे अंदाजापेक्षा जास्त उत्पादन होत आहे. जागतिक बाजारपेठेत दर चांगला असल्‍याने यंदा ब्राझीलची साखर बहुतांश देशांना निर्यात होईल, अशी शक्‍यता आहे.

यंदा जगभरात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे. भारत, थायलंडसारखे अनेक साखर उत्पादक देश यंदा साखरेच्या उत्पादनाच्‍या बाबतीत पिछाडीवर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ब्राझीलमध्ये वाढणारे साखरेचे उत्पादन तिथल्या साखर उद्योगाला फायदेशीर ठरणार आहे. जॉब इकॉनॉमिया या संस्‍थेने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये साखर उत्पादनाबाबत सकारात्मक बाबी आढळून आल्या आहेत.

यंदा ब्राझीलचे एकूण उत्पादन ४२० लाख टन होईल, असा अंदाज आहे. संस्थेने अगोदर वर्तवलेल्या साखर अंदाजापेक्षा २० लाख टनांनी हे उत्पादन अधिक असेल, अशी शक्यता आहे. ब्राझीलच्या दक्षिण आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये साखर उत्पादन वेगात आहे. यंदाची ब्राझीलची साखर निर्यात ३२० लाख टन इतकी उच्चांकी होईल, असा अंदाज आहे. २०२२-२३ ला ती २७० लाख टन होती.

जगातील देशांमध्ये जाणाऱ्या साखरेमध्ये फक्‍त ब्राझीलचा साखर वाटा तब्ब्‍ल ५० टक्क्यांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे. आंतराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती उच्चांकी आहेत आणि याच अनुकूल वातावरणाचा लाभ ब्राझीलमधील साखर कारखान्यांना होताना दिसत आहे.

ब्राझीलने यंदा इथेनॉल उत्पादनाबाबतची भूमिकाही बदलली आहे. वाढत्‍या साखर दराचा फायदा घेण्यासाठी ब्राझील यंदा इथेनॉल उत्पादनात काहीशी घट करण्याचाही लवचिक विचार करत आहे. काही कारखान्यांनी जादाची साखर निर्मितीही सुरू केली आहे.

भारताचे स्थान डळमळीत होणार

दोन वर्षांपूर्वी उत्पादन आणि निर्यात या दोन्ही स्तरावर ब्राझीलला धोबीपछाड देत भारताने विक्रम केला. जगात दोन्ही बाबतीत अग्रस्थान पटकावले. यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा निर्माण झाला.

यंदा मात्र भारत सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण केलेले स्थान डळमळीत होणार आहे. संभाव्य कमी उत्पादन आणि देशांतर्गत बाजारपेठेत किमती वाढू न देण्याचे धोरण केंद्र आखत आहे.

यामुळे भारताची साखर किती प्रमाणात देशाबाहेर जाईल याबाबत साशंकता आहे. यामुळे वाढलेल्या दराचा भारतीय साखर उद्योगाला काहीच फायदा होणार नाही हे निश्चित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT