Sugar Market : पाकिस्‍तानातून अफगाणिस्‍तानात साखरेची तस्करी?

Sugar Market Update : साखरेच्या किमती पाकिस्तानात आवाक्याबाहेर गेल्या आहेत. साखरेची अफगाणिस्तानात तस्करी होत असल्याचा संशय बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Sugar Market
Sugar MarketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : साखरेच्या किमती पाकिस्तानात आवाक्याबाहेर गेल्या आहेत. साखरेची अफगाणिस्तानात तस्करी होत असल्याचा संशय बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अचानक किमतीत वाढ झाल्याने पाकिस्तान सरकारकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या भाववाढीमुळे पाकिस्‍तान सरकार साखर आयातीच्या निर्णयापर्यंत आले आहे. साखरेची टंचाई भासू नये यासाठी पाकिस्तान सरकार २०० रुपये (पाकिस्‍तानी चलन) दराने दहा लाख टन साखर आयात करण्याच्या मानसिकतेत आहे. हा सर्व बोजा पाकिस्‍तानी नागरिकांवर पडणार आहे.

Sugar Market
Sugar Market Rate : जादा कोट्यानंतरही साखरेच्या दरात वाढ

साखरेच्या किमती गगनाला भिडल्याने साखरेबाबत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या साखरेच्या किमती किरकोळ बाजारात १८० रुपयांच्या वर गेल्या आहेत. साखरेचा काळाबाजारही सुरू असल्याने चिंतेत भरच पडली आहे. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने (ईसीसी) साठेबाजी आणि तस्करीची चौकशी करण्यास सांगितले आहे.

घाऊक दरात वाढ झाल्यामुळे ऑनलाइन मार्ट आणि किरकोळ दुकानदार साठेबाजीतून मोठा नफा कमवत आहेत. एकीकडे भारतात साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सातत्याने प्रयत्न करत असताना शेजारी पाकिस्‍तानात मात्र साखरेच्या दराबाबत अनियंत्रित स्थिती निर्माण झाली आहे.

Sugar Market
Sugar Market : जुलैच्या साखर विक्रीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ

पाकिस्‍तान सरकारने काही दिवसांपूर्वीच दहा लाख टनांचा कॅरिओव्हर स्टॉक असल्याने चिंता करण्याची परिस्‍थिती नसल्याचे तेथील सरकारने म्हटले होते. पण १ ऑगस्टपासून पाकिस्तानात साखरेच्या किमतीत भरमसाट वाढ झाली.

पंजाब प्रांतात १६० ते १६२, सिंधमध्ये १५० ते १५५, पाकव्‍याप्‍त काश्मीरमध्ये १५० ते १६०, तर बलुचिस्तानात १५० ते १५८ रुपये किलो दर मिळत आहे. एक ऑगस्टपासून ३० ऑगस्टपर्यंत साखरेच्या होलसेल दरात क्विंटलला तब्बल २१०० रुपयांची (किलोला २१ रुपये) वाढ झाली आहे.

दरवाढीमुळे गोंधळाची स्थिती

२०२३ ला पाकिस्तानची साखर निर्यात २ लाख १५ हजार टन झाली. यातून १० कोटी डॉलरची कमाई केली. जून २०२३ ला ५ हजार टन निर्यात केली. २०२२ ला निर्यातीवर प्रतिबंध लावण्‍यात आले होते. २० लाख टन साखरेची उपलब्धता असताना अचानक झालेल्‍या दरवाढीमुळे पाकिस्तानात गोंधळाची स्थिती आहे. नियमबाह्यरीत्या साखर देशाबाहेर जात असल्याने साखरेची टंचाई निर्माण होत असल्याची चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com