Sugar Market Rate : जादा कोट्यानंतरही साखरेच्या दरात वाढ

Sugar Industry : केंद्राने जुलै महिन्यात स्थानिक साखर विक्रीचा कोटा दोन लाख टनांनी वाढवून दिला असला तरी सध्या स्थानिक बाजारात साखरेचे दर जूनच्या तुलनेत क्विंटलला किमान ५० ते १०० रुपयांनी वाढलेले आहेत.
Sugar Rate
Sugar Rate Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्राने जुलै महिन्यात स्थानिक साखर विक्रीचा कोटा दोन लाख टनांनी वाढवून दिला असला तरी सध्या स्थानिक बाजारात साखरेचे दर जूनच्या तुलनेत क्विंटलला किमान ५० ते १०० रुपयांनी वाढलेले आहेत. गत हंगामात साखर उत्पादन कमी झाल्याच्या परिणाम सध्या स्‍थानिक बाजारात दिसून येत आहे.

सध्या देशांतर्गत बाजारात बहुतांश राज्यांत साखरेचे दर ३५०० ते ३६०० रुपयांच्या दरम्‍यान आहेत. जुलैचा वाढीव कोटा जाहीर झाल्यानंतर दर नरमतील अशी शक्यता होती. पण अद्यापही खरेदी चांगली असल्याने दरात काही प्रमाणात वाढ असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

गेल्या हंगामात साखर उत्पादन घटले. मे महिन्‍यात जितकी तेजी अपेक्षित होती तितकी आली नाही. पण जूनमध्ये मात्र दरात वाढ झाली. ही वाढ उच्चांकी नसली तरी पंधरा दिवसांच्या अंतराने क्विंटलला ५० ते १०० रुपये इतकी होती.

Sugar Rate
Sugar Production : देशात ३३० ते ३३८ लाख टन साखर निर्मिती शक्‍य

जुलैमध्ये अतिरिक्त कोटा जाहीर झाल्यानंतर जादा साखर विक्री करावी लागणार असल्याने कारखानदार साखर मोठ्या प्रमाणात विक्रीस काढतील व दरात घट होईल अशी भीती कारखाना पातळीवर होती. जुलै मध्यावर येत आहे.

कोटा जाहीर झाल्यानंतर पहिलया आठ दहा दिवसांत तरी दरात घसरण झाली नाही. कारखाने सावधगिरीनेच साखरेची विक्री करत आहेत. देशातील काही कारखान्‍यांकडे साखरेचा पुरेसा साठा नसल्याचीही स्‍थिती आहे.

उत्तर प्रदेशासारख्या राज्याने यंदा साखर इथेनॉलनिर्मितीला वापरण्यास प्राधान्‍य दिले. तर महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २५ लाख टनांनी साखर कमी तयार झाली. या मुळे जादा साखर कोट्याचा जितका दबाव कारखान्यांवर अपेक्षित होता तितका आला नाही. व्यापाऱ्यांनीही साखर खरेदी फारशी कमी केली नाही.

Sugar Rate
Sugar MSP: साखरेच्या किमान विक्री किमतवाढीकडे सरकारचे दुर्लक्ष

यामुळे उच्चांकी नसली तरी थोडी थोडी दिलासादायक वाढ सुरू असल्‍याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. ही वाढ पुढील हंगाम सुरू होईपर्यंत तरी कायम रहावी या अपेक्षेत कारखानदार आहेत. दिवाळीपर्यंत किमान ३८०० रुपयांपर्यंत दर गेल्‍यास कारखादारांना ती फायदेशीर ठरेल. यामुळे शेतकऱ्‍यांची थकित देणी भागवणे शक्‍य होईल, असे एका कारखाना प्रतिनिधीने सांगितले.

कोल्हापूर, सांगलीत कारखान्यांना ३५०० रुपये दर

कोल्हापूर, सांगली, विजापूर, बेळगाव आदी भागांतील साखर कारखान्‍यांना क्विंटलला ३५०० रुपयांच्या आसपास साखरेला दर मिळत आहे. म्हैसूर, आंध्र, तमिळनाडू सीमारेषा परिसरातील कारखान्‍यांना ३६०० रुपयांपर्यंत तर तमिळनाडूतील खासगी साखर कारखान्‍यांना ३७०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com