Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Import Duty : बांगलादेशकडून कांद्यावर पुन्हा १० टक्के आयात शुल्क

Agricultural Trade : भारतीय कांद्याचा सर्वांत मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने कांदा आयातीवर गुरुवारपासून (ता. १६) १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. परिणामी, कांदा निर्यातीचे कामकाज पुन्हा अस्थिर होण्याची चिन्हे असून, कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांची डोकेदुखी वाढली आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : भारतीय कांद्याचा सर्वांत मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने कांदा आयातीवर गुरुवारपासून (ता. १६) १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. परिणामी, कांदा निर्यातीचे कामकाज पुन्हा अस्थिर होण्याची चिन्हे असून, कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांची डोकेदुखी वाढली आहे.

बांगलादेशातील उत्पादित कांद्याची देशांतर्गतच निकासी व्हावी या उद्देशाने बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने (एनबीआर) कांद्याच्या आयातीवरील १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. सध्याच्या दराप्रमाणे प्रतिकिलोला ६ रुपये हे शुल्क लागणार आहे. यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी बांगलादेशात कांद्याची देशांतर्गत उपलब्धता व रास्त दरात कांदा मिळण्यासाठी आयात शुल्क शून्यावर करण्यात आले होते. मात्र हा निर्णय १५ जानेवारीपर्यंत हा निर्णय कायम होता. आता ७० दिवसांनंतर पुन्हा शुल्क लागू झाल्याने भारतीय कांद्याला अपेक्षित परतावा मिळण्यात अडचणी येणार आहेत.

डिसेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने नवीन खरीप व लेट खरीप कांद्याची आवक वाढलेली आहे. मात्र एकीकडे २० टक्के निर्यात शुल्क तर त्यातच प्रमुख आयातदार असलेल्या बांगलादेशने १० टक्के आयात शुल्क लागू केल्याने कांदा निर्यात घटण्याची शक्यता आहे. त्यातच पुरवठा सुरळीत होऊन कांद्याचे दर पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.

आयात शुल्काचा कामकाजावर परिणाम

मागील वर्षी २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सर्वाधिक २० टक्के कांदा निर्यात बांगलादेशमध्ये होती. मात्र केंद्र सरकारने सातत्याने ग्राहकांच्या हितासाठी कांद्यासंबंधी निर्णय घेतले. हस्तक्षेप करत निर्यात बंदी, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य असे निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले आहेत. एकीकडे देशात २० टक्के निर्यात शुल्क असताना मुख्य आयातदार बांगलादेशने लागू केलेले १० टक्के आयात शुल्क कामकाजावर परिणाम करणारे आहे.

स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी बांगलादेश सरकारने दहा टक्के आयात शुल्क लावले, यासाठी भारत सरकारने २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ शून्य करणे हाच एक पर्याय आहे.
विकास सिंह, उपाध्यक्ष, हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशन
बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशात होणाऱ्या कांदा निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे. दररोजच्या कांदा दर घसरणीमुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे.
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT