Banana Transportation Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Transportation : दिल्लीला केळीची रेल्वेद्वारे अल्प वाहतूक

Kisan Railway Initiative : किसान रेल्वे या केंद्र सरकारच्या उपक्रमातून दर आठवड्याला दोनदा रेल्वेचे आधुनिक प्रकारचे डबे (व्हीपीयू वॅगन) केळी पाठवणुकीसाठी रावेर अन्य भागांत रास्त भाडेदरात उपलब्ध करण्याची मागणी सतत केली जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : भाडेवाढ व इतर समस्यांमुळे दिल्ली येथे रेल्वेने केळीची वाहतूक अल्प किंवा अधूनमधून केली जात आहे. मध्यंतरी किंवा २०२१ पूर्वी आठ वर्षे रेल्वेने केळीची वाहतूक ठप्प होती. एप्रिल २०२१ मध्ये बंद असलेली रेल्वेने केळीची पाठवणूक सुरू झाली होती.

त्या वेळेस रावेर (जि. जळगाव) येथील मालधक्क्यावरून १८ डब्यांतून सुमारे १६२ टन केळीची पाठवणूक दिल्ली येथील आझादपूर बाजारासाठी करण्यात आली होती. नंतर ही वाहतूक फारशी झाली नाही. यंदा मे व जूनमध्ये खरेदीदार, शेतकऱ्यांच्या प्रयत्नांतून पुन्हा ही वाहतूक झाली.

पूर्वी रेल्वेने केळी वाहतुकीमुळे केळीचे दर टिकून राहायचे. केळीची खरेदी वेगात व्हायची. पण ही वाहतूक भाडेवाढ, रेल्वेचे डॅमरेज (दंड) व इतर नियम आदी कारणांमुळे बंद पडली. ट्रकद्वारे केळीची वाहतूक पंजाब, काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे केली जाते. त्यासाठी अधिकचे वाहतूक भाडे खरेदीदारांना द्यावे लागते.

यामुळे केळी उत्पादकांना कमी दर मिळतात. किसान रेल्वे या केंद्र सरकारच्या उपक्रमातून दर आठवड्याला दोनदा रेल्वेचे आधुनिक प्रकारचे डबे (व्हीपीयू वॅगन) केळी पाठवणुकीसाठी रावेर अन्य भागांत रास्त भाडेदरात उपलब्ध करण्याची मागणी सतत केली जात आहे.

रेल्वेने केळी वाहतूक सुरू होण्यासाठी रावेर फळबागायतदार संघाने सतत प्रयत्न केले. या रेल्वेने एकाच वेळी १८ डबे उपलब्ध होऊ शकतात. यातून १६२ टन केळीची पाठवणूक करता येते. एका डब्यात नऊ टन केळी भरण्यात येते. एका डब्यासाठी २०२१ मध्ये १५ हजार ३०० रुपये एवढे भाडे आकारले होते. ट्रकने वाहतुकीच्या तुलवेत हा भाडे दर कमी आहे. याचा लाभ व्यापारी, खरेदीदार व पर्यायाने केळी उत्पादकांना होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT