Kisan Railway : शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू करणार : डॉ. विखे

उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यास अधिकचा नफा कसा करून देता येईल याकरिता आमचा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Railway
RailwayAgrowon
Published on
Updated on

Nagar News : शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी नगर येथून किसान रेल सुरू करणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले. त्यासाठी रेल्वेमंत्र्याना भेटणार असल्याचे ते म्हणाले.

नगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीनिमित्त शनिवारी (ता. १५) कार्यकर्ता मेळावा झाला. माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, अक्षय कर्डिले उपस्थित होते.

मेळाव्यानंतर खासदार डॉ. विखे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक ही गाडीने होते. त्याकरिता खर्च हा जास्त लागत असून, हा खर्च कमी केला तर शेतकऱ्याला फायदा होईल, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसान रेल्वेने आपल्या भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल हा पाठविण्यासाठी किसान रेल्वे ही नगर येथे सुरू करण्याची मागणी केली आहे.

Railway
Processing Training : नंदुरबारच्या शेतकऱ्यांना प्रक्रियाविषयक प्रशिक्षण

लवकरच ही किसान रेल्वे आपल्याकडे सुरू होईल. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यास अधिकचा नफा कसा करून देता येईल याकरिता आमचा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

बाजार समितीसाठी स्वतंत्र रस्ता मंजूर करून अडीच कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.

कांदा अनुदानात काही अटी - शर्तीमुळे अडचण येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावर या आठवड्यात शासन योग्य निर्णय घेणार असून, याची लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतील.

विरोधकांकडे कुठलेही विकास कामा बाबत दिशा नाही की त्यांच्याकडे वैचारिक पात्रता, केवळ विरोध करायचा म्हणून खोटे आरोप करत आहेत. अशा आरोपांना आपण भीक घालत नाहीत, आपले नाणे खणखणीत आहे. त्यामुळे आपण कोणाचाही विचार करत नाहीत.

विखे पाटील घराण्यांनी गोरगरीब जनतेसाठी काम केले आहे आणि तोच वारसा आपणही पुढे चालवत असून, आमच्यावर कुठलाही डाग नाही हाच पोटशूळ विरोधकांना सतावत असतो.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com