Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळी दर टिकून

Khanddesh Banana Market : खानदेशात मागील दीड महिन्यांपासून केळी दर टिकून आहेत. सध्या कमी दर्जाच्या केळीला प्रतिक्विटल ६०० ते ७००, दर्जेदार केळीला १५००, १८५०, १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दीड महिन्यांपासून केळी दर टिकून आहेत. सध्या कमी दर्जाच्या केळीला प्रतिक्विटल ६०० ते ७००, दर्जेदार केळीला १५००, १८५०, १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

काश्मीर, पंजाब भागांत पाठवणुकीच्या दर्जेदार केळीलादेखील २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. केळीची आवक खानदेशात कमीच आहे.

रावेर, मुक्ताईनगर, यावल, नंदुरबारातील शहादा, अक्कलकुवा, तळोदा भागात मागील मृग बहरातील केळीची काढणी ९७ ते ९८ टक्के झाली असून, या क्षेत्रात केळीची फारशी आवक नाही. या भागात पिलबाग केळीची आवक रखडत सुरू आहे. पिलबागांमधील आवक वाढण्यास अद्याप आठ ते १० दिवस लागतील.

सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव, भडगाव-पाचोरा, धुळ्यातील शिरपूर भागात केळीची आवक सुरू आहे. कांदेबाग केळी बागांमधून (मागील हंगामात ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या बागा) आवक सुरू असून, खानदेशात मिळून मागील १० ते १२ दिवस प्रतिदिन सरासरी ७० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक झाली. यात चोपडा व जळगाव भागांत आवक अधिक राहिली.

मागील हंगामात आगाप लागवडीच्या बागांत आवक अधिक आहे. नियमित किंवा हंगामातील बागांमध्ये आवक रखडत सुरू आहे. नवरात्रोत्सवात नियमित बागांमधून आवक वाढेल. सध्या केळीला उठाव आहे. कारण मध्य प्रदेशातही आवक कमी झाली आहे. तेथेही रोज ८० ते ९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

तेथेही किमान १०५० व कमाल २७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. केळीला पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या भागांत उठाव आहे. काश्मिरात खानदेशातून रोज १० ते १२ ट्रक केळीची पाठवणूक केली जात आहे. तसेच दिल्ली व पंजाबमध्येही मोठा उठाव आहे. कमी दर्जाची केळी ठाणे, कल्याण, नागपूर, छत्तीसगड, राजस्थान या भागात पाठविली जात आहे.

निर्यात अल्प

खानदेशात सध्या चोपडा तालुक्यातून दोन कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक परदेशात केली जात आहे. या भागातही आठवड्यातून दोन तीन वेळेस परदेशात पाठवणुकीसंबंधी केळीची काढणी केली जाते.

तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातूनही आठवड्यातून दोन तीन वेळेस परदेशात केळीची पाठणूक करण्यासंबधी खरेदीदार कंपन्या कार्यवाही करीत आहेत. जळगाव जिल्ह्यातून केळीची निर्यात या महिन्यात कमालीची कमी झाली आहे. निर्यातीच्या केळीला २६५० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT