Banana CMV : खानदेशात केळीवर पुन्हा‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव

Banana Disease : खानदेशात गेल्या जून, जुलैमध्ये लागवडीच्या मृग बहर केळी बागांमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) रोग दिसून आला आहे.
Banana CMV
Banana CMVAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात गेल्या जून, जुलैमध्ये लागवडीच्या मृग बहर केळी बागांमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) रोग दिसून आला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, नंदुरबारातील शहादा तालुक्यांतही ही समस्या आहे. सुमारे आठ हजार हेक्टरवरील बागांत हा रोग दिसला आहे.

जळगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ गणेश देशमुख व सहकारी, पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन, रावेर तालुका कृषी विभागातील कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके आदींनी शेतकऱ्यांच्या सूचना, तक्रारी यानुसार रावेरात पाहणी केली आहे.

Banana CMV
Banana CMV : ‘सीएमव्ही’ मुळे केळीवर फिरविला रोटावेटर

कृषी यंत्रणांनी नुकतीच निंबोल येथे मनोज श्रीराम पाटील पाटील यांच्या शेतात पाहणी केली. त्यात सीएमव्ही दिसून आला आहे. त्यांच्या १० हजार केळी झाडांच्या बागेत कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) रोगाचा १२ टक्के प्रादुर्भाव आहे.

एक हजार झाडांमध्ये १०० झाडे रोगग्रस्त दिसली आहे. रावेरातील केऱ्हाळे, निरूळ, कुंभारखेडा, विवरे, चिनावल, अभोडा, रसलपूर या भागांतही सीएमव्ही आहे. मुक्ताईनगर येथे चांगदेव येथेही समस्या दिसली आहे. या रोगाची सध्या सुरुवातची आहे. मागील वर्षीदेखील सप्टेंबरमध्ये सीएमव्हीने थैमान घातले होते.

एकट्या जळगाव जिल्ह्यात नऊ हजार हेक्टरवरील केळी बागा काढून फेकाव्या लागल्या होत्या. त्यासंबंधी शासनाने १७ कोटी रुपये मदतनिधीही नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना दिला. यंदाही सप्टेंबरमध्येच ही समस्या दिसली असून, ती वाढतच आहे. लहान बागांत केळीची पाने लाल, पिवळी होऊन, झाडाची पूर्णतः वाढ खुंटत आहे. त्याचा बुंधाही नष्ट झालेला दिसून येतो. कुठलीही फवारणी घेऊन रोगग्रस्त झाडाची स्थिती सुधारत नाही. ते काढावेच लागते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Banana CMV
Banana CMV : केळीवरील ‘सीएमव्ही’बाबत नुकसानीचे पंचनामे पूर्ण

मध्य प्रदेशातही समस्या

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातही मागील जुलैमध्ये लागवडीच्या केळी बागांत सीएमव्ही दिसला आहे. तेथेही जळगाव येथील केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. सीएमव्ही जुलैमध्ये लागवडीच्या बागांत अधिकचा दिसत आहे. मे, जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवडीच्या बागांत सीएमव्ही नसल्याची स्थिती आहे. परंतु यंदा मागील वर्षाएवढा तीव्र किंवा झपाट्याने सीएमव्हीचा प्रसार बागांत झालेला नाही, असेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

आंतरपिके व तणांमुळे समस्या

मागील वेळेस अधिकचा पाऊस होता. तेव्हादेखील सीएमव्हीचा फैलाव झाला. यंदा पाऊस कमी आहे तरीदेखील सीएमव्हीचा फैलाव होत आहे. केळी पिकात उडीद, मूग आदी आंतरपिके रावेर, बऱ्हाणपूर भागांत घेतली जातात.

यामुळे या पिकांतील मावा किंवा समस्या सीएमव्ही रोगाचा वाहक म्हणून कार्यरत असल्याचे दिसले आहे. तसेच बागांच्या भोवतीचे मोठे तण, केळी लागवडीपूर्वीचे मका पिकाचे बेवडदेखील सीएमव्हीला कारणीभूत ठरत आहे, असे केळी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. पुजारी म्हणाले.

सीएमव्हीची समस्या रावेर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरात आली आहे. यासंबंधी केळी संशोधन केंद्र पाहणी व शेतकऱ्यांत जनजागृती, मार्गदर्शन कार्यक्रम राबवीत आहे. सीएमव्हीची समस्या मागील वर्षाएवढी तीव्र नाही. परंतु शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कीडनाशकांची फवारणी निर्देशानुसार करावी. तसेच रोगग्रस्त झाडे बागेबाहेर फेकावीत.
- डॉ. सी. व्ही. पुजारी, प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव
केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरस हा विषाणूजन्य रोग याच महिन्यात रावेरातील अनेक भागांत दिसला आहे. त्याचा नायनाट एका वर्षात किंवा लागलीच होणार नाही. सध्या त्याची सुरुवात आहे. शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.
- महेश महाजन, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल (ता. रावेर, जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com