Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळी दरात घट सुरूच

Banana Rate : सध्या निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर १३०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळी दरात घट सुरूच आहे. दर १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. सध्या निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर १३०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत. तर किमान दर ७००, ९०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. मध्यम दर्जाच्या केळीस १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत घट झाली आहे. मध्यंतरी दरांमधील चढउतार व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, केळी दरांवर नियंत्रण याबाबाबत रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांत चर्चा झाली होती.

काही दिवस दर वधारतात. लागलीच त्यात १०० ते २०० रुपयांची घट होते. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु या बैठकीनंतरही दरात घट सुरूच आहे. बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत रविवारी (ता. ७) केळीला कमाल ११८१ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

या दरांवर जळगाव, धुळे व नंदुरबारात केळीची थेट किंवा शिवार खरेदीचा निर्णय खरेदीदार घेत आहेत. यामुळे बऱ्हाणपुरातील दरांवर नियंत्रणाची मागणी कायम आहे. खानदेशात केळीची आवक कमी होत आहे. सध्या प्रतिदिन २२० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

उशिराच्या मृग बाग केळीमधून सध्या केळीची काढणी सुरू आहे. केळीची आवक सध्या जळगावातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, नंदुरबारातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात सुरू आहे. दर्जेदार केळीची थेट खरेदी करून शेतात पॅकिंग केली जात आहे. ही केळी काश्मीर, पंजाब, दिल्ली येथे पाठविली जात आहे. केळीला उत्तरेकडे उठाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT