Banana Market : खानदेशात केळीला कमाल १२०० रुपये दर

Khandesh Banana Rate : खानदेशात केळीचे दर कमी-अधिक होत आहेत. मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूर येथील बाजारात केळी दरात घसरण झाली आहे.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात केळीचे दर कमी-अधिक होत आहेत. मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूर येथील बाजारात केळी दरात घसरण झाली आहे. तेथे कमाल १६५० रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. तर खानदेशात थेट किंवा शिवार खरेदीत किमान ७०० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

केळी दरात मागील काही दिवसात पुन्हा नरमाई आली आहे. बऱ्हाणपुरात केळीचे कमाल दर १८०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले होते. मध्यंतरी चांगले दर होते. परंतु आवक कमी अधिक होत असून, मागणीदेखील कमी झाल्याने दरात नरमाई आली आहे. उत्तरेकडील भाग म्हणजेच पंजाब, काश्मीर, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये केळीला उठाव आहे.

Banana Market
Banana Market : निर्यातीच्या केळीला १२०० रुपये प्रतिक्विंटल दर

राज्यातही आंबा व इतर फळांची आवक बाजारात कमी असल्याने केळीच्या दरात मोठी घट झालेली नाही. केळीला उठाव आहे. खानदेशात दर्जेदार केळीची काढणी सुरू आहे. सध्या उशिराच्या मृग बहर केळी बागांतून काढणी होत आहे. दर्जेदार केळी रावेर, मुक्ताईनगर, यावल, नंदुरबारातील शहादा भागात काढणीसाठी उपलब्ध आहे. तसेच धुळ्यातील शिरपुरात काही शेतकऱ्यांची केळी काढणीवर आहे.

Banana Market
Banana Market : खानदेशात केळी दरात सुधारणा

केळी उत्पादनात आघाडीवर असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागात केळीची आवक काहीशी कमी झाली आहे. सध्या खानदेशात रोज २५५ ते २६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. खानदेशात पिलबाग व उशिराच्या नवती केळी काढणीवर आहे. कमी दर्जाच्या केळीला खानदेशात ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

मध्य प्रदेशात कमी दर्जाच्या केळीला कमी उठाव आहे. बऱ्हाणपूर येथे सध्या रोज १३० ट्रक केळीची आवक होत आहे. जळगावात अधिकची केळी आवक होत आहे. उत्तरेकडील मॉल, आठवडे बाजारात केळीची पाठवणूक सुरू आहे.

शिवाय दिल्ली येथील आझादपूर बाजारातही केळीला मोठी मागणी आहे. या भागातील मोठे खरेदीदार यावलमधील फैजपूर, रावेरातील सावदा, चोपडा आदी भागांतील एजंटच्या मदतीने केळीची खरेदी करून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com