Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळी आवक आणखी घटली; दर मात्र स्थिर

Jalgaon Banana News : केळीची जूनमध्ये जळगाव जिल्ह्यातून प्रतिदिन सरासरी ३२५ ट्रक पाठवणूक विविध भागांत सुरू होती. या महिन्यात मात्र आवक कमालीची घटली.

Team Agrowon

Banana Rate Jalgaon : खानदेशात केळीची आवक मागील आठ ते १० दिवसांत आणखी १० ते ११ ट्रकनी (एक ट्रक १६ टन क्षमता) घटली आहे. केळीचे दर स्थिर असून, उठावही आहे. केळीला सध्या प्रतिक्विंटल ८०० ते १८०० दर मिळत आहेत.

केळीची जूनमध्ये जळगाव जिल्ह्यातून प्रतिदिन सरासरी ३२५ ट्रक पाठवणूक विविध भागांत सुरू होती. या महिन्यात मात्र आवक कमालीची घटली. कारण आगाप बागांची काढणी रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात पूर्ण झाली.

सध्या जुनारी (काढणी ५० ते ७० टक्के पूर्ण झालेल्या बागा), पिलबाग (खोडवा) केळीमधून केळीची आवक सुरू आहे. मागील सहा ते सात दिवसांपासून प्रतिदिन सरासरी ९५ ट्रक केळीची आवक सुरू आहे. ही या हंगामातील नीचांकी आवक आहे. स्थानिक बाजारासह परराज्यांतही केळीला उठाव आहे.

उत्तर भारतात दिल्ली, काश्मीरातील केळीची पाठवणूक कमी आहे. परंतु छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेशात केळीची पाठवणूक वेगात सुरू आहे. तसेच राज्यात पुणे, कल्याण, ठाणे, नवी मुंबई भागातही केळीची पाठवणूक खानदेशातून सुरू आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही सध्या प्रतिदिन ९० ते ९५ ट्रक केळीची आवक होत आहे. तेथे केळीला १०५० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

सध्या खानदेशात नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागात आवक सुरू आहे. धुळ्यातील शिरपूर भागातही आवक सुरू आहे. परंतु जळगावमधील चोपडा, पाचोरा-भडगाव भागात आवक अल्प आहे.

जामनेर, मुक्ताईनगर, यावल, रावेर या भागांत आवक अधिक आहे. पुढे आवक आणखी कमी होईल. कारण जुनारी बागांमधील केळीची काढणीदेखील पूर्ण होत आहे. तसेच पुढे कांदेबाग केळीची आवक ऑगस्टनंतर सुरू होईल.

निर्यातही अल्प

खानदेशातून केळीची आखातातील निर्यातही घटली आहे. सध्या रोज सात ते आठ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची आयात आखातातील विविध कंपन्या करीत आहेत. नंदुरबारमधील शहादा व धुळ्यातील शिरपूर भागातून प्रतिदिन चार ते पाच कंटेनर केळीची पाठवणूक परदेशात होत आहे. तर जळगावमधून रोज तीन कंटेनरची पाठवणूक सुरू आहे. निर्यातीची केळीही कमी उपलब्ध आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT