Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : शिल्लक साखरेमुळे किमान ६० लाख टन निर्यातीचे आव्हान

राज्यात गेल्या हंगामातील ३० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. नव्या उत्पादनानंतर एकूण साखर उपलब्धता १६८ लाख टनापर्यंत राहील.

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यात गेल्या हंगामातील ३० लाख टन साखर शिल्लक (Sugar) राहण्याचा अंदाज आहे. नव्या उत्पादनानंतर (Sugar Production) एकूण साखर उपलब्धता १६८ लाख टनापर्यंत राहील. त्यामुळे इथेनॉलसासाठी (Ethanol) किमान १२ लाख टन साखर वळवून ६० लाख टन साखरेची निर्यात (Sugar Export) करण्याचे आव्हान राज्यासमोर आहे, अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली.

राज्यात सध्या १४ लाख ८७ हजार हेक्टरवर नवा ऊस उभा आहे. चांगल्या पावसामुळे उत्पादकता हेक्टरी ९५ टनापर्यंत राहील. त्यामुळे येत्या गाळप हंगामासाठी खासगी व सहकारी साखर कारखान्यांकडे किमान १४ लाख ४३ हजार टन ऊस येण्याची शक्यता आहे. यातून शिल्लक उसाची समस्या उद्भवू नये, या साठी एक ऑक्टोबरपासून कारखान्यांची धुराडी पेटविण्यास मान्यता देण्याची शिफारस साखर आयुक्तालयाने मंत्री समितीकडे केली आहे.

केंद्र शासनाने २०२२-२३ च्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांना १०.२५ टक्के मूळ साखर उताऱ्यासाठी प्रतिटन ३०५० रुपये रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) जाहीर केली आहे. तसेच, १०.२५ टक्क्यांच्या पुढे ०.१ टक्के उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना ३०.५० रुपये दिले जाणार आहेत. १०.२५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ९.५० टक्क्यांपेक्षा जास्त उतारा असल्यास ०.१ टक्के उताऱ्याकरितादेखील प्रतिटन ३०.५० रुपये मिळणार आहेत. मात्र, ९.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास शेतकऱ्याला उसाचा भाव प्रतिटन फक्त २८२१ रुपये २५ पैसे इतका मिळणार आहे.

मंत्री समितीची उद्या बैठक

मंत्रि समितीची बैठक उद्या (ता.१९) होत असून त्यात गाळपाच्या अंतिम तारखेवर शिक्कामोर्तब होईल. राज्यात आगामी गाळप हंगामात १३८ लाख टन साखर नव्याने तयार होण्याची क्षमता आहे. मात्र, १२ लाख टन साखर क्षमता सरळ इथेनॉल निर्मितीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दीडशे लाख टन साखर तयार होऊ शकेल, असे आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्याच्या ऊस गाळपात गेल्या हंगामात तोडणी व वाहतुकीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना त्रास झाला. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम लवकर चालू करून ३० एप्रिलपूर्वी संपविण्याचा आमचा मानस आहे.
शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT