Sugar Industry : शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्ट

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या (२०२१-२२) मूल्यमापनामध्ये कागलचा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देशात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या कारखान्यास वसंतदादा पाटील पारितोषिक जाहीर झाले आहे.
Shahu Sugar
Shahu Sugar Agrowon
Published on
Updated on

कोल्हापूर : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (National Co-operative Sugar Factories Federation) वतीने करण्यात आलेल्या (२०२१-२२) मूल्यमापनामध्ये कागलचा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना (Chhatrapti Shahu Cooperative Sugar Mill) देशात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या कारखान्यास वसंतदादा पाटील पारितोषिक जाहीर झाले आहे.

Shahu Sugar
Sugar : कारखान्यांच्या गोदामांवर छापे टाका, बेहिशोबी साखर कळेल

दिल्लीस्थित केंद्रीय मुख्य साखर संचालक यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीद्वारे वर्ष २०२१-२२ साठीची निश्‍चित केलेली एकूण २१ पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी गुरुवारी (ता. १५) जाहीर केली. या वेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. २१ पारितोषिकांत महाराष्ट्राने दहा पारितोषिकांसह प्रथम क्रमांक पटकाविला. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश व तमिळनाडूला प्रत्येकी तीन पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

Shahu Sugar
Sugar Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर समाधानकारक

गुजरात व हरियाना यांनी प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली. तर मध्य प्रदेशाला एक मिळाले. पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यातील साखर कारखान्यांचा सहभाग होता.

तर उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) साखर उतारा असणाऱ्या राज्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, मध्य परदेश आणि तमिळनाडूतील कारखान्यांचा समावेश होता. तसेच ‘एका कारखान्याला एक पारितोषिक’ असे धोरण ठरविण्यात आले. नवी दिल्ली येथे होणाऱ्या एका विशेष समारंभात ही पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय अन्नमंत्री पीयूष गोयल आदींची प्रमुख उपस्थिती असेल, असे श्री. नाईकनवरे यांनी सांगितले.

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन

(उच्च उतारा विभाग) ः

श्री नर्मदा खांड उद्योग, सहकारी मंडली लि. (गुजरात)

श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडली लि., बार्डोली (गुजरात)

उर्वरित विभाग ः

प्रथम पारितोषिक : चेंगलारायन को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि., तमिळनाडू

दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. स्नेह रोड, नजीबाबाद (उत्तर प्रदेश)

विक्रमी ऊस गाळप (उच्च उतारा विभाग) ः

विठ्ठलराव शिंदे स.सा.का. पिंपळनेर, माढा, सोलापूर

उर्वरित विभाग

शाहाबाद को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि., कुरुक्षेत्र (हरियाना)

विक्रमी साखर उतारा (उच्च उतारा विभाग) ः

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा, सांगली (महाराष्ट्र)

उर्वरित विभाग

दि किसान सहकारी चिनी मिल्स लि., गजरौला (उत्तर प्रदेश)

विक्रमी साखर निर्यात

प्रथम : श्री दत्त शेतकरी सहकारी कारखाना शिरोळ, कोल्हापूर

द्वितीय ः सह्याद्री स.सा.का. लि., सातारा

अति उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (उच्च उतारा विभाग) ः

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी कारखाना कुंडल, सांगली (महाराष्ट्र)

डी. एस. ८ सुब्रमणिया सीवा को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि. (तमिळनाडू)

विजेते ठरलेले कारखाने

उत्कृष्ट ऊस उत्पादकता

(उच्च उतारा विभाग)

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. पुणे

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, अमृतनगर

उर्वरित विभाग ः

नवलसिंग स.सा.का. मर्यादित, नवल नगर, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)

कल्लाकुरीची : को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि. काचीरायापालयम (तमिळनाडू)

तांत्रिक कार्यक्षमता

(उच्च उतारा विभाग) ः

श्री पांडुरंग लि. सोलापूर

श्री विघ्नहर जुन्नर, पुणे

उर्वरित विभाग ः

दि कर्नाल मिल्स लि. कर्नाल (हरियाना)

दि किसान मिल्स अजमगड

(उत्तर प्रदेश)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com