डॉ. अतुल पाटणे Poultry Management : परसातील कुक्कुटपालन ही संकल्पना आपल्यासाठी नवीन नाही. परंतु आता हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब करून चांगल्या प्रकारे करता येतो. परसातील कुक्कुटपालनासाठी कावेरी, गिरिराज, वनराज, डीपी क्रॉस या जातींची निवड करावी.\.कुक्कुटपालन हा व्यवसाय इतर पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत कमी जागेत कमी वेळेत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून अंडी, मांस असे दुहेरी उत्पादन घेता येऊ शकते. हा व्यवसाय अगदी शेतीहीन किंवा अल्पभूधारक शेतकरी देखील करू शकतो. .Backyard Poultry Management : परसातील सुधारित कोंबडीपालनाचे तंत्र.कोंबड्यांचे अंडी व मांस हे सर्वांत स्वस्त मिळणारे प्रथिनांचा स्रोत आहे. राज्य व केंद्र सरकारकडून कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनांद्वारे अनुदान दिले जाते. व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळविण्याच्या हेतूने आधुनिक पद्धतीने परसातील कुक्कुटपालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाच्या बाबींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे..कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रकारब्रॉयलर कोंबडीपालन ः मांस उत्पादनासाठीलेअर कोंबडीपालन ः अंडी उत्पादनासाठीअंडी उबवणी युनिट ः पिले तयार करण्यासाठीलेअर कोंबड्यांची विक्रीः अंडी घालण्यासाठी तयार पक्षी विकणेपरसातील कुक्कुटपालन ः सुधारित देशी कोंबड्यांचे संगोपन.Backyard Poultry : परसबागेतील कुक्कुटपालनातून अर्थकारणाला गती.व्यवस्थापनाचे मुद्देजातचांगल्या प्रतीचे मांस, अंडी उत्पादनासाठी सुधारित देशी जातीच्या कोंबड्यांचे संगोपन करावे. उदा. कावेरी, गिरिराज, वनराज, डीपी क्रॉस.आहारकोंबड्यांना नुसते शिळे उरलेले, वाया गेलेले अन्न किंवा धान्य न देता त्यांना संतुलित व पौष्टिक आहार तसेच स्वच्छ पाणी द्यावे. जेणेकरून कोंबड्यांची वाढ लवकर झपाट्याने होईल..सुरक्षितताकोंबड्यांना मोकळे किंवा उघड्यावर न ठेवता त्यांना किमान साधे शेड किंवा निवारा करावा, जेणेकरून त्यांचे ऊन, पाऊस किंवा वादळापासून संरक्षण होईल.परस बागेत किंवा शेडच्या भोवती कुंपण करावे, ज्यामुळे इतर प्राणी किंवा पक्षी यांच्यापासून कोंबड्यांचे रक्षण होईल.स्वच्छताखुराडे, पिंजरे किंवा शेडमध्ये नियमित व्यवस्थित स्वच्छता करावी. खाद्य किंवा पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित धुवावीत. त्यामुळे रोगराई टाळता येईल.रोग नियंत्रणआपल्या शेडमध्ये कोंबड्यांना कोणताही रोग होऊ नये म्हणून काटेकोर व्यवस्थापन ठेवावे. महत्त्वाच्या रोगांचा प्रसार होऊ नये यासाठी लसीकरण करावे, गरजेनुसार औषधे द्यावेत.- डॉ. अतुल पाटणे, ८३०८७८९९४८(सहायक आयुक्त पशुसंवर्धन, अकोले, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.