Sesame | Groundnut Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Oilseed Market : तीळ, भुईमुगाची आवक विदर्भात मंदावली

Sesame Rate : विदर्भातील यवतमाळ, अमरावती, कारंजा (वाशीम) या भागात उन्हाळी भुईमुगासह तिळाची लागवड होते. या दोन्ही शेतीमालाची वाढलेली आवक आता कमी झाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : विदर्भातील यवतमाळ, अमरावती, कारंजा (वाशीम) या भागात उन्हाळी भुईमुगासह तिळाची लागवड होते. या दोन्ही शेतीमालाची वाढलेली आवक आता कमी झाली आहे.

अमरावती बाजारात भुईमूग शेंगांची दरदिवशी सरासरी केवळ २० क्‍विंटल आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. त्याच वेळी तिळाला ११ ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. यापूर्वी तिळाचे दर दबावात होते.

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पॅटर्न होता. परंतु गेल्या काही वर्षांत या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला. परिणामी, शेंगधारणा न होणे, त्यासोबतच इतरही अनेक प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत होते. त्यामुळेच या पिकाचा पिच्छा सोडत शेतकऱ्यांनी तीळ लागवडीवर भर दिला.

दारव्हा तालुक्‍यातील काजीपूर हे तीळ लागवडीमुळे नावारूपास आले आहे. तसेच महागाव तालुक्‍यातील उटी, पांढरकवडा या भागातही तीळ लागवड होते. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटात मात्र शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीत सातत्य राखले आहे.

सध्या उत्पादित शेतीमालाचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने भुईमुगासह तीळ विक्रीसाठी बाजारात येत आहे. आवक सातत्याने कमी-जास्त होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. अमरावती बाजारात दर दिवशी भुईमुगाची सरासरी १२० क्‍विंटल आवक होते. आता ती कमी झाली आहे. गेल्या हंगामाच्या शेवटी भुईमुगाचे दर ५००० रुपयांवर गेले होते.

सध्या भुईमूग शेंगांचे व्यवहार ५८०० ते ६२५० रुपयांनी होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. त्याच वेळी तिळाला ११००० ते १२००० रुपयांचा दर मिळत आहे. कारंजा लाड (जि. वाशीम) बाजार समितीत देखील तिळाची आवक होत आहे.

सुमारे ३० क्‍विंटल तिळाची आवक कारंजा बाजार समितीत होत आहे. यापूर्वी आवक १५० क्विंटल वर होती. तिळाला ११४५० ते ११५०५ रुपयांचा दर मिळाला. कारंजा बाजार समितीत आवक ५५० क्विंटल इतकी आहे. शेंगांचे दर ५२०० ते ६८०० रुपये प्रतिक्विंटल असे होते.

यवतमाळमध्ये भुईमूग दरात वाढ

यवतमाळ बाजार समितीत देखील तिळाची आवक होत असून, त्यास ११ हजार ७०० ते ११ हजार ८०० रुपये दर मिळत आहेत. यापूर्वी येथे दर ११७०० ते १२८०० रुपयांवर होते. त्यात मोठी घट झाली.

याच बाजारात भुईमुगाला ६०३६ ते ६२८५ रुपयांचा दर मिळत आहे. यापूर्वी यवतमाळ बाजार समितीमध्ये भुईमुगाचे दर दबावात होते. आता आवक कमी होत असल्याने दरात वाढ अनुभवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT