Climate Change : बदलत्या वातावरणाचा देशातील शेतीवरही परिणाम होत आहे. वातावरण बदलामुळे गहू उत्पादनात (Wheat Production) २०५० पर्यंत १९.३ टक्के तर कोरडवाहू तांदूळ उत्पादनात २० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
तसेच २०८० पर्यंत गहू उत्पादन ४० टक्क्यांनी आणि कोरडवाहू तांदूळ उत्पादन ४७ टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे हवामान बदल परिणाणाचे मुल्यांकनातून पुढे आले.
पण शेती हवामान बदलाला अनुकूल करण्यासाठी सरकारने योजना आखल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत दिली.
संसदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कृषिमंत्री तोमर यांनी ही माहिती दिली. देशातील शेतीवर बदलत्या वातावरणाचा काय परिणाम होऊ शकतो.
तसेच याने मानवी जीवन कसे प्रभावित होईल आणि सरकार या दृष्टीने काय उपाययोजना करत आहे, असा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला होता.
कृषिमंत्री तोमर म्हणाले की, भारतीय शेतीवर बदलत्या वातावरणाचा काय परिणाम होऊ शकतो? याचे निष्कर्ष काढण्यासाठी देशातील विविध भागांमध्ये मुल्यांकन प्रोजक्ट आखण्यात आले होते. यातून २०५० आणि २०८० पर्यंत देशातील शेतीवर काय परिणाम होऊ शकतो, याचे निष्कर्ष काढण्यात आले.
कोरडवाहू भाताची उत्पादकता निम्म्यावर येईल
वातावरण बदलाविरोधातील उपायांचा अवलंब केला नाही तर कोरडवाहू भात उत्पादकता २०५० पर्यंत २० टक्क्यांनी घटेल, २०८० पर्यंत ४७ टक्क्यांची घट येईल.
तर सिंचनाची सुविधा असलेल्या भाताची उत्पादकता २०५० पर्यंत ३.५ टक्क्यांनी तर २०८० पर्यंत ५ टक्क्यांनी कमी होईल, असा निष्कर्ष आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
मका उत्पादनातही घट होईल
जगात मका हे महत्वाचे धान्य पीक आहे. पशुधन आहारात मक्याचा वापर होत असतो. भारतात मक्याचं लागवड क्षेत्र आणि उत्पादनही वाढत आहे. पण वातावरण बदलामुळे मक्याच्या उत्पादनात २०५० पर्यंत १८ टक्क्यांची घट येऊ शकते.
तर २०८० पर्यंत मका उत्पादन २३ टक्क्यांनी कमी होईल, असाही निष्कर्ष मुल्यांकनातून पुढे आला.
वातावरण बदलाविरोधात सरकरचा अॅक्शन प्लॅन
सरकारने वातावरणाचा शेतीवर काय परिणाम होऊ शकतो, याचे मुल्यांकन केल्यानंतर त्यावर उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. राष्ट्रीय शाश्वत शेती मिशन आणि हवामान बदलावर राष्ट्रीय कृती योजना सुरु केल्या आहेत.
यातून शेतीवरील वातावरणा बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी संशोधन आणि उपाय करण्यात येत आहेत.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने पीक उत्पादन वाढीसाठी नॅशनल इनोवेशन इन क्लायमेट रेजिलन्ट अॅग्रीकल्चर हा प्रकल्प सुरु केला. वातावरण बदलाला अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रसार करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.