
Wheat Market Update रिसोड, जि. वाशीम ः नवीन गव्हाची बाजारात आवक (Wheat Arrival) सुरू होताच ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल गव्हाचे भाव (Wheat Rate) कमी झाले आहेत.
मागील महिन्यात अडीच हजारांवर असलेला गहू आता १८०० ते २००० रुपयांदरम्यान विकत आहे. शेतमाल घरात येतात भाव कोसळतात याचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना प्रत्यय आला आहे.
या वर्षी सिंचनासाठी मुबलक पाणी असल्यामुळे तसेच ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये गव्हाला बाजारात चांगला भाव मिळाल्याने तालुक्यात शेतकऱ्यांनी गव्हाच्या क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ केली होती. सध्या गव्हाची काढणी जोमाने सुरू झालेली आहे.
दुसरीकडे बाजार समितीत विक्रीसाठी गव्हाची आवक वाढली. नवीन मालाची आवक सुरू झाल्यानंतर सर्वच प्रकारच्या धान्याचे भाव घसरतात. गव्हाच्या बाबतीतही येथे तसेच घडते आहे.
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण शेत मालावरच अवलंबून असते. गहू बाजारात येताच दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.
गहू लागवडीच्या काळात दर अडीच हजारांवर होता. पण आता आवक यायला सुरुवात होताच बाजारात १८०० ते २००० पर्यंत दर खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.