Moong Agrowon
ॲग्रोमनी

Moong Market: देशातील बाजारात मुगाचे दर तेजीतच

Moong Rate : यंदा तूर आणि उडदाबरोबर मुगाच्या दरातही तेजी आली आहे. मुगाचे दर हंगामाच्या सुरुवातीपासूनच तेजीत आहेत. बाजारात आता उन्हाळी मुगाची आवकही सुरु झाली.

Team Agrowon

Moong Bajarbhav : यंदा तूर आणि उडदाबरोबर मुगाच्या दरातही तेजी आली आहे. मुगाचे दर हंगामाच्या सुरुवातीपासूनच तेजीत आहेत. बाजारात आता उन्हाळी मुगाची आवकही सुरु झाली.

पण प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मुगाला चांगला भाव मिळतोय. सध्या मुगाला सरासरी ७ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

देशातील बाजारात आता उन्हाळी हंगामातील मुगाची आवक वाढत आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील बाजारात उन्हाळी मुगाची आवक वाढत आहे. त्यामुळं मुगाचे दर स्थिर दिसत आहेत. राजस्थानमधील बाजारांमध्येही मुगाचे भाव स्थिर दिसले.

महाराष्ट्रातही मुगाचे भाव प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ७०० ते ९ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहीले. तर राजस्थानमध्ये मुगाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला.

मुगाचा मुख्य हंगाम खरिपच आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये खरिप हंगामातच मुगाची लागवड होते. त्यामुळे उत्पादनही रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या तुलनेत अधिक राहते. पण यंदा महत्वाच्या मूग उत्पादक राज्यांमध्ये पावासाने पिकाचे मोठे नुकसान केले.

तसेच कीड-रोगाने पिकाला फटका बसला. यामुळे खरिपातील मुगाच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली, असे शेतकरी सांगतात. व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या माहितीला दुजोरा दिला. खरिपातील उत्पादन घटल्याने मुगाच्या दरातही तेजी आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच मुगाचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत.

खरिपाची लागवडही तोंडावर आहे. त्यामुळे लागवडीसाठी बियाणे म्हणूनही मुगाला मागणी वाढत आहे. त्यामुळे मागील आठवडाभरात मुगाच्या दरात क्विंटलमागं ३०० रुपयांची सुधारणा झाली. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही मुगाच्या दरात क्विंटलमागं २०० रुपयांची वाढ झाली होती. मुगाला सरासरी ७ हजार ५०० ते ७ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला.

उन्हाळी हंगामातही मुगाची लागवड कमी झाली होती. गुजरातमध्ये उन्हाळी मुगाची लागवड ३३ टक्क्यांनी कमी झाली. मागील हंगामात मुगाखाली ७० हजार हेक्टर होतं. ते यंदा ४७ हजार हेक्टरवर पोचले. पण देशपातळीवरचा विचार करता उन्हाळी लागवड ८ टक्कयांनी वाढली आहे. १६ लाख हेक्टरवर मुगाची लागवड झाली आहे. मागील हंगामात उन्हाळी मुगाची लागवड १४ लाख हेक्टरवर झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT