Summer Moong Sowing : उन्हाळी मूग लागवडीबाबत पळसखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग

समूह पीक प्रात्यक्षिकधारक निवडक ५० शेतकऱ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.
Farmers Training
Farmers Training Agrowon

Washim News : कृषी विज्ञान केंद्रातंर्गत (Agricultural Science Center) उन्हाळी हंगामात २० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मूग (Moong Sowing) समूह पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम पळसखेडा (ता. रिसोड) येथे घेण्यात आला. समूह पीक प्रात्यक्षिकधारक निवडक ५० शेतकऱ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण वर्गाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच तथा प्रगतिशील शेतकरी गजाननराव खरात होते. पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष खरात, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष माणिकराव खरात, अर्जुन पाटील खरात, तंटामुक्तीचे अध्यक्ष शेषराव पाटील खरात, पोलिस पाटील, अरुण पाटील खरात, प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील खरात, कृषी सहाय्यक डी. डी. इडोळे, इतर नागरिक उपस्थित होते.

Farmers Training
Mung, Urad, Jowar Productivity : मूग, उडीद, ज्वारीची उत्पादकता घटली

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक केव्हीकेचे कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी तांत्रिक सादरीकरणामध्ये उन्हाळी मूग उत्पादन व पीक संरक्षण तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग पिकामध्ये अवलंब करावयाचे अद्यावत वाण, पेरणीपूर्व करावयाची बीज प्रक्रिया, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्र, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्र तसेच उन्हाळी मूग पिकांमधील संतुलित ओलिताचे व्यवस्थापन या बाबींची माहिती दिली.

शेतकऱ्यांनी विचारलेल्या उन्हाळी मूग पिकासंदर्भातील विविध प्रश्नांची उत्तरेही दिली. या प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन भगवान देशमुख यांनी करीत आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com