Chana Procurement
Chana Procurement Agrowon
ॲग्रोमनी

Chana Procurement : हमीभावाने ६६ हजारांवर क्विंटल हरभऱ्याची खरेदी

Team Agrowon

Parbhani News: किमान आधारभूत किंमत (एमएसपी) (MSP) खरेदी योजनेअंतर्गंत यंदा (२०२२-२३) हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीसाठी नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ (व्हिसीएफ) अंतर्गंत परभणी-हिंगोली जिल्ह्यात १८ केंद्रावर ३१ हजार १४० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे.

या दोन जिल्ह्यातील १७ खरेदी केंद्रांवर ४ हजार २०१ शेतकऱ्यांकडून ६६ हजार २८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर १८ हजार ७४० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. शुक्रवार (ता. ७) पर्यंत सर्व केंद्रांवर २ हजार १० शेतकऱ्यांच्या ३२ हजार ५४४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ११ हजार ५६ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. शुक्रवार (ता.७) पर्यंत केंद्रांवर २ हजार ५५ शेतकऱ्यांकडून ३१ हजार २१९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली.

विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या गंगाखेड (जि. परभणी) येथील केंद्रांवर १ हजार ५८८ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली असून १३६ शेतकऱ्यांचा २ हजार ४६५ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

केंद्रनिहाय शेतकरी नोंदणी, हरभरा खरेदी स्थिती (खरेदी क्विंटलमध्ये)

केंद्र - शेतकरी नोंदणी- हरभरा खरेदी - शेतकरी संख्या

परभणी - २२०८- ३८९५ - २२३

जिंतूर- ११५९ - २३८१ - १५४

बोरी - २२८५- ६७७६- ४१८

सेलू - ३१२० - ४५९९- २८६

मानवत - ३१०५ - ५४२१- ३३९

पाथरी- २८८० - ३४९७ - २३०

सोनपेठ - १५९५ - १३७ ८९

पूर्णा - २३८८- ४५९४ - २७१

हिंगोली - २४७८ -६९३४ - ४६३

कनेरगाव - ८७४ - ३१०७- १९३

कळमनुरी - १८५० - ६२५१- ४१८

वसमत - १२२६- १०८६ - ६९

जवळा बाजार - २८१६ - ५७२१- ३९०

सेनगाव - १११२ - ५८५८ - ३७२

साखरा - -५७९- - १७८८- १२५

येळेगाव- २६ - ०० - ००

वारंगा फाटा - ९५- ४७२ - २५

गंगाखेड - १५८८- २४६५ - १३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT