Agriculture Success Story: मुजफ्फरपूर जिल्ह्यातील आनंदपूर नावाच्या गावाला ओळख दिली आहे ती एका साध्या शेतकरी स्त्रीनं. राजकुमारी देवीनं केवळ आपल्या नव्हे, तर आपल्या जिल्ह्यातल्या १९ गावांचं चित्र पालटून टाकलं आहे ते पिकांचं वैविध्य राखून आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतीची नवी तंत्रं वापरून.