Nashik News: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चार लाखांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३१७ कोटी १५ लाख ७७ हजार रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. सोमवार (ता.२०) पासून वितरण सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. .सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन लाख ९९ हजार ८०६ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान समोर आले. त्यामध्ये मका, सोयाबीन, भात, द्राक्ष, कांदा, डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांनुसार जिल्ह्यात पंधराही तालुक्यांतील ४ लाख ९ हजार ४७४ शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला..Ativrushti Madat: शेतकऱ्यांना ६४८ कोटी रुपये मिळणार; २३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर .शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य शासनाने ३१७ कोटी १५ लाख ७७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सोमवारी (ता.२०) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रांची पूर्तता असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा होत आहे. .Ativrushti Madat: जून ते सप्टेंबर महिन्यातील पीक नुकसानीपोटी मदतीचा नवा जीआर.मात्र, दिवाळीमुळे पुढील दोन दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे. परिणामी, काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे..रक्कम परस्पर वर्ग केल्यास बँकांवर कारवाईशासनाने देऊ केलेल्या मदतीची रक्कम ही बँकाकडून परस्पर कर्जखात्यावर वर्ग केली जाण्याची अथवा कर्जाचे हप्ते थकल्याने बँकाकडून रोखून धरली जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे व्यवस्थापकांसाठी आदेश काढले आहेत. .या आदेशात कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम कर्जखात्यात वर्ग करण्यास बंधने घालण्यात आली आहेत. तसेच रक्कम रोखूनही धरण्यास मनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.