Chana Market Update Pune: नाफेड (NAFED) (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) मार्फत मार्केटिंग फेडरेशनने बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Baramati APMC) मुख्य बाजार आवारात यांत्रिक चाळणी येथे हमीदरानुसार हरभरा खरेदी (Chana Procurement) ३ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
नीरा कॅनॉल संघ ही एजन्सी नेमून ही खरेदी सुरू झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. या वेळी बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघाचे मॅनेजर सुरेश काकडे, प्रशांत मदने तसेच सूर्यकांत मोरे व शेतकरी उपस्थित होते.
केंद्रावर आतापर्यंत ११ शेतकऱ्यांचा १६० क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. खरेदी शासनाचे हमीदर प्रति क्विंटल रुपये ५ हजार ३३५ यानुसार होत आहे. तरी नोंदणी केलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी मेसेज आल्यानंतर आपला शेतीमाल स्वच्छ व वाळवून खरेदी केंद्रावर आणावा असे आव्हान बाजार समितीचे वतीने करण्यात आले आहे.
या केंद्रावर १२५ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शेतीमाल आणण्यासाठीचा एसएमएस पाठविण्यात येणार असून, ज्या शेतकऱ्यांना मोबाइलवर एसएमएस येईल त्यांनी मेसेजमध्ये नमूद त्याच दिवशी आपला हरभरा शेतीमाल घेऊन यावयाचे आहे.
कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांध्ये १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये. ३५० प्रति क्विंटल प्रमाणे व जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी यानुसार अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
या निर्णयानुसार बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वरील कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी या कांदा अनुदान मिळण्याकरिता फॉर्म भरण्याची मुदत ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२३ आहे.
तरी मुदतीत शेतकऱ्यांनी खालील नमूद अटीनुसार जळोची उपबाजार भाजी मार्केट येथे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रस्ताव व फॉर्म सादर करावेत, असे आवाहन प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.