LPG Rate Agrowon
ॲग्रोमनी

LPG : घरगुती गॅस सिलिंडर@११०४ रुपये

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली होती; मात्र, आता घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः तेल कंपन्यांनी (Oil Company) घरगुती गॅस (LPG Rate) (१४.२ किलो) सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ केली. त्यामुळे आता घरगुती सिलिंडरची (Domestic LPG Rate) किंमत ११०४ रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. याआधी मार्च २०२२ मध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सिलिंडर खरेदी करणेही अवघड झाले आहे.

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली होती; मात्र, आता घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. गॅस वितरक कंपन्यांनी बुधवारी (ता. ६) सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवले आहेत. तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. नागपूर शहरात आता १४.२ किलो सिलिंडरची किंमत १०५४ रुपयांवरून ११०४ रुपये झाली आहे.

पहिल्यांदाच घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. १ जुलैला व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १९८ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी (ता. ७) पुन्हा नऊ रुपयांनी दर कमी केले आहेत. शहरात १९ किलो व्यावसायिक सिलिंडरचे दर आता २४६५ रुपये झाले आहेत. याआधी ही किंमत २४७६ रुपये होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT