Kharip Sowing Agrowon
ॲग्रोमनी

पेरण्या लांबल्यामुळे शेतीतील बेरोजगारीत वाढ

जूनमध्ये कृषी क्षेत्रातले (Agriculture Sector) जवळपास ८ दशलक्ष रोजगार कमी झाले.'' गेल्या दोन वर्षांशी तुलना करता रोजगाराचे प्रमाण घटले आहे.

Team Agrowon

(वृत्तसंस्था)

देशात खरीप हंगामातील (Kharip Sowing) पेरण्या लांबल्यामुळे बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण वाढले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जूनमधील बेरोजगारीच्या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी महेश व्यास म्हणाले, "जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतात मजुरांची संख्या रोडावली. जूनमध्ये कृषी क्षेत्रातले (Agriculture Sector) जवळपास ८ दशलक्ष रोजगार कमी झाले.'' गेल्या दोन वर्षांशी तुलना करता रोजगाराचे प्रमाण घटले आहे. एकंदरीत, देशातील बेरोजगारीची परिस्थिती आधीच गंभीर असताना शेतीसंबधी रोजगाराची आकडेवारी काळजी वाढवणारी आहे.

ग्रामीण भागाचं अर्थकारण पीक-पाण्यावर अवलंबून असतं. पावसाने जून महिन्यात ओढ दिल्यामुळे देशात अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या परताव्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली. तसेच बी-बियाणे, शेतमजूर यांच्यावरील गुंतवणूक (Investment) कमी झाली. जूनमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. शेतीतील रोजगार घटल्याचं हे लक्षण आहे.

देशपातळीवर विचार करता भात शेतीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते. परंतु यंदा प्रमुख भात उत्पादक (Paddy Grower States) राज्यांमध्ये पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या. आता अनेक राज्यांमध्ये पेरण्या सुरू झाल्या आहेत. पण पुढील काळात पावसाचे प्रमाण आणि वितरण कसे राहते, यावर पिकांचं सगळं गणित अवलंबून आहे.

अलिकडच्या काही वर्षांत पावसातील खंड, कमी कालावधीत जास्त पाऊस होणे, ऐन पीक वाढीच्या अवस्थेत पाऊस गायब होणे, काढणीच्या वेळी पावसाने झोडपणे असे प्रकार वाढले आहेत. वातावरणातील बदलाचे (क्लायमेट चेंज) चटके शेतीला मोठ्या प्रमाणावर बसत आहेत. त्याचाही रोजगारनिर्मितीवर मोठा परिणाम होईल, असा या क्षेत्रातील जाणकारांचा कयास आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT