Chana Market Rate updates
Chana Market Rate updates Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : उष्णतेमुळे हरभऱ्याचे नुकसान; दर सुधारण्याचे संकेत !

Anil Jadhao 

Chana Market Rate : महाराष्ट्रात यंदा हरभऱ्याची सर्वाधिक लागवड (Gram Cultivation) झाली. अनेक भागातील हरभरा काढणीही सुरु झाली. मात्र सध्या दर दबावात आहेत. त्यामुळं शेतकरी नाफेडला हरभरा घालण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

पण दुसरीकडे नाफेड (Nafed) कमी दरातील हरभरा विक्री कमी करताना दिसत आहे. तर वाढलेल्या उष्णतेचाही पिकाला फटका बसताना दिसत आहे. यामुळे हरभरा दरात सुधारणा होण्याचे संकेत आहेत, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील काही भागांमध्ये सध्या हरभरा काढणी सुरु झाली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरभरा काढणीचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच मार्च महिन्यात हरभरा पीक शेवटच्या टप्प्यात असेल.

पण फेब्रुवारी महिन्यापासूनच वाढलेल्या उष्णतेचा फटका हरभरा पिकाला बसताना दिसत आहे. शेतकरी आणि स्थानिक कृषी विभागांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील पिकाला फेब्रुवारी महिन्यात कमी अधिक प्रमाणात फटका बसला.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील हरभरा उत्पादकता १० ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. तर हरभरा लागवडीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातही वाढलेल्या उन्हामुळे हरभरा उत्पादकता घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मार्च महिन्यातही उष्णता जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. म्हणजेच मार्च महिन्यातही हरभरा पिकाला वाढलेल्या उष्णतेचा फटका बसणार आहे.

उष्णतेमुळे हरभरा वेळेआधीच पक्व होत आहे. त्यामुळं गुणवत्ता आणि उत्पादकताही कमी येत आहे. राजस्थानमध्ये ऊन जास्त तापत आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही उष्णता अधिक असल्याचं दिसतं.

तसचं महाराष्ट्रासह महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये काही ठिकाणी पाऊसही पडत आहे. त्याचा फटका हरभरा पिकाला बसताना दिसतोय. त्यामुळे सरकारचा विक्रमी उत्पादनाचा अंदाज यंदा चुकणार असल्याची चर्चा बाजारात आहे.

उत्पादनाचे अंदाज चुकणार?

सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाजात यंदा १३६ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. पण व्यापारी आणि उद्योगाच्या मते १०० ते १०५ लाख टनांपेक्षा सध्या तरी उत्पादन जास्त होईल असं वाटत नाही.

मार्च महिन्यात उष्णता जास्त राहिल्यास उत्पादनातील घट जास्त राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाफेडची विक्री बंद?

दुसरीकडे नाफेडने अनेक भागातील हरभरा विक्री बंद केली. नाफेडने कमी दरातील विक्री बंद केल्याने दरात क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा दिसून आली.

दिल्ली आणि मुंबई ग्राहक बाजारात हरभरा दर वाढले होते. नाफेडने पुढील दोन ते तीन महिने कमी दरातील विक्री बंद ठेवल्यास हरभरा बाजाराला आधार मिळू शकतो.

किती हरभरा शिल्लक?

नाफेडची हमीभावाने हरभरा खरेदीही सुरु होणार आहे. सध्या नाफेडकडे १५ ते १६ लाख टनांच्या दरम्यान हरभऱ्याचा स्टाॅक आहे. त्यामुळे नाफेड यंदा किती हरभरा खरेदी करू शकते, यावरून चर्चा सुरु आहे.

नाफेडसह देशात सध्या २२ लाख टन हरभरा शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाफेडकडे हरभरा स्टाॅक चांगला असला तरी इतर कडधान्य मात्र कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

पुढील काळात तूर, मसूर, उडीद आणि मूग डाळ चांगलाच भाव खाण्याची शक्यता आहे. त्यामुळं डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारची भीस्त हरभऱ्यावरच असेल.

काय राहू शकते परिस्थिती?

सध्या हरभरा दर दबावात असले तरी पुढील काळात नाफेडची खेरदी सुरु झाली आणि उत्पादनातील घट स्पष्ट झाल्यास हरभरा दराला आधार मिळू शकतो. पुढील दोन महिन्यांमध्ये देशातील उत्पादनाचं चित्र स्पष्ट होईल.

त्यामुळं हरभरा दर हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात. नाफेडने पुढील काही महिने कमी दरात हरभरा विक्री केली नाही तर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT