Chana Market : हरभरा विक्रीसाठी राज्यातील कोणत्या केंद्रांवर नोंदणी सुरू?

राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील गतवर्षीच्या (जुन्या) ५ केंद्रांना, तसेच नवीन ६ केंद्रांना नाफेडने अद्याप मंजुरी दिलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
Chana Market
Chana Market Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२२-२३) हंगामात केंद्र शासनाच्या (Central Government) आधारभूत किंमत (एमएसपी) (MSP) खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने हरभरा खरेदीसाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाने (नाफेड) (Nafed) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ११ आणि दि विदर्भ सहकारी पणन महासंघअंतर्गत परभणी जिल्ह्यात १ अशा एकूण १२ केंद्रांना मंजुरी दिली आहे.

या केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास सोमवारी (ता. २७), तर शुक्रवार (ता. ३)पासून ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे.

राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील गतवर्षीच्या (जुन्या) ५ केंद्रांना, तसेच नवीन ६ केंद्रांना नाफेडने अद्याप मंजुरी दिलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Chana Market
Chana Procurement : सात-बारा अद्ययावत नसल्याने हरभरा नोंदणीत अडचण

यंदाच्या रब्बी हंगामातील (२०२२-२३) हरभऱ्याची हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी यंदा परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १२ क्विंटल ५० किलो आणि हिंगोली जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १२ क्विंटल उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे.

राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा या ६ खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून, त्या ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

परंतु गतवर्षीच्या (जुन्या) बोरी (ता. जिंतूर) आणि पाथरी या २ केंद्रांना, तसेच यंदा प्रस्तावित (नवीन) पोखर्णी, पेडगाव, बामणी, वालूर या ठिकाणच्या ४ खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली नाही. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ), सेनगाव या ५ केंद्रांना मंजुरी मिळाली.

परंतु गतवर्षीच्या (जुन्या) कन्हेरगाव, साखरा, वारंगा या ३ केंद्रांना, तसेच नवीन येळेगाव आणि चौंडी या २ केंद्रांना अद्याप मंजुरी मिळाली नाही, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करिता सोबत रब्बी हंगाम २०२२-२३ मधील हरभरा पीकपेरा नोंद असलेला ऑनलाइन सातबारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, सोबत आणावे व बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खात किंवा पतसंस्थेतील खाते क्र. देऊ नये) संबंधित केंद्राच्या ठिकाणी हमीभावाने हरभरा विक्रीकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Chana Market
Tur Chana Market : अकोला बाजार समिती तूर, हरभरा आवकेने फुल्ल

ऑनलाइन नोंदणी संथ गतीने...

पोर्टल सुरू नसल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस शेतकऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रांगा लावून अर्ज सादर केले. पोर्टल सरू झाल्यानंतर ऑनलाइन शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी सुरू झाली.

परंतु ऑनलाइन प्रकिया संथ गंतीने सुरू आहे. दिवसभरात जेमतेम १०० अर्ज ऑनलाइन करता येत आहेत, असे एका केंद्रचालकाने सांगितले. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १५ मार्चपर्यंत पूर्ण करावी, तर हरभरा खरेदी १४ मार्चपासून सुरू करावी, अशा सूचना पणन विभागातर्फे देण्यात आलेल्या आहेत.

राज्य सहकारी पणन महासंघ आणि व्हीसीएफअंतर्गत मंजूर केंद्र

केंद्राचे नाव - केंद्राचे ठिकाण - केंद्रचालक - संपर्क क्रमांक

परभणी वसमत रोड, ता. परभणी, माणिक निलवर्ण, ९९६००९३७९६

जिंतूर, जिंतूर, नंदकुमार महाजन, ९४०५४७३९९९

सेलू मार्केट यार्ड, सेलू, विठ्ठल शिंदे, ९८६०९८६८५४

मानवत मार्केट यार्ड, मानवत, माणिक भिसे, ९८६०६५४१५९

सोनपेठ शेळगाव रोड, सोनपेठ, श्रीनिवास राठोड, ९०९६६९९६९७

पूर्णा समर्थ मार्केट यार्ड, पूर्णा, संदीप घाटोळ, ९३५९३३३४१३

हिंगोली बलसोंड, ता. हिंगोली, समीर पाटील, ९४२२९२२२२२

कळमनुरी कृउबा समिती, कळमनुरी, महेंद्र माने, ९७३६४४९३८३

वसमत कृउबा समिती, वसमत, सागर इंगोले, ८३९०९९५२९४

जवळा बाजार जवळा बाजार, ता. औंढा नागनाथ, कृष्णा हरणे, ९१७५५८६७५८

सेनगाव सेनगाव, जि. हिंगोली, नीलेश पाटील, ९८८११६२२२२

गंगाखेड गंगाखेड, जि. परभणी, लक्ष्मण भोसले, ९६२३८७८९८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com